लोकदर्शन 👉 मोहन भारती
चंद्रपूर : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र चे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेव गिरी महाराज चंद्रपूर येथे आयोजित काष्ठ पूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
आळंदी येथील तपोवन स्थित वेदश्री वेद पाठशाळेत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी आचार्य गोविंद देव गिरी महाराज यांची भेट घेऊन त्यांना या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती केली. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी जाणारे काष्ठ चंद्रपूर येथून जात असल्याचा आनंद आणि उत्साह चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील रामभक्त जनतेमध्ये आहे. या निमित्त बल्लारपूर येथे भव्य दिव्य काष्ठ पूजन आणि चंद्रपूर शहरात शोभायात्रा आयोजित करण्यात आल्याची माहीती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आचार्यांना दिली; आणि या शुभ प्रसंगी आशिर्वाद प्रदान करण्यास उपस्थित राहावे अशी विनंती त्यांना केली .
या निमंत्रणाचा स्वीकार करुन आचार्य गोविंद देव गिरी महाराज यांनी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. या सोहळ्याला येण्यास आचार्य गोविंद देव गिरी महाराजांनी सहमती देणे हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण असून यामुळे या सोहळ्याला अधिक वैभव प्राप्त होणार आहे असे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
याखेरीज उत्तर प्रदेशचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री योगेंद्र उपाध्याय स्टॅम्प, न्यायालय शुल्क राज्यमंत्री श्री रविंद्र जायस्वाल
वन, पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ अरुणकुमारजी हेदेखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.