लोकदर्शन आटपाडी 👉राहुल खरात
कला विज्ञान महाविद्यालय आटपाडी व पद्मभूषण.डॉ.नागनाथ अण्णा नायकवडी कॉलेज झरे यांच्या संयुक्त विद्यमाने NAAC कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.एस.व्ही.लोंढे के.एन.भिसे आर्ट कॉमर्स महाविद्यालय, भोसरे होते , ते म्हणाले की, महाविद्यालयांनी सकारात्मक दृष्टीने NAACला सामोरे जाणे गरजेचे आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील होते. ते यावेळी म्हणाले की निश्चितपणे आम्ही महाविद्या लयाचे NAAC करून घेण्यासाठी शंभर टक्के योगदान देऊ व NAAC करून घेऊ . कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी कॉलेजचे प्राचार्य राजाराम पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार IQAC समन्वयक प्रा.सचिन सरक यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा.बालाजी वाघमोडे , प्रा.डॉ.भारती देशमुखे, प्रा.डॉ. बाळासाहेब कदम, प्रा संतोष सावंत, प्रा.डॉ.सुधाकर भोसले, श्री विश्वेश्वर खंदारे ,श्री सर्जेराव पाटील, पद्मभूषण डॉ.नागनाथ अण्णा नायकवडी झरे महाविद्यालयाचे IQAC समिती समन्वयक प्रा. नितीन पाटील प्रा.मधुकर खांडेकर प्रा.देवकुळे प्रा.काळेल मॅडम व सर्व प्राध्यापक शिक्षकेतर स्टाफ कार्यक्रमासाठी उपस्थित होते.