by : Satish Musle
राजुरा :
अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) व्दारा आयोजित महिला संवाद मेळावा नुकताच राजुरा नगरातील संत नगाजी महाराज भवन येथे पार पडला.
या महिला संवाद मेळाव्याचे अध्यक्ष राजुरा निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार अँड. संजयभाऊ धोटे तर कार्यकामाचे उद्घाटक श्री. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एम वारकड सर होते. यादवराव धोटे महाविद्यालयचे प्राध्यापक गोविंद झाडे सर ,सौ.संध्याताई धोटे तथा अनुलोम राजुरा भाग समन्वयक सतिश मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या मनात मानाचे स्थान रुजवत सामाजिक बांधिलकी जपत सर्वागीण विकास साधणारे लोकाभिमुख नेते विकास पुरुष अशी ओळख निर्माण करणाऱ्या या लोकप्रतिनिधीला आज जागतिक संवाद महिला कार्यक्रमात या महिलांनी ” अँड संजय धोटे हे देव माणूस असल्याची संज्ञा बहाल केली.
राजुरा विधानसभा क्षेत्रात माजी आमदार संजय धोटे यांनी लोकप्रतिनिधी दायित्वाअंतर्गत त्यांचे कार्यकाळात सामाजिक,धार्मिक क्षेत्रासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिला,याबद्दल आदरणीय धोटे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
“देवमाणुस” ही संज्ञा उपस्थित महिला संवादिनी कडुन संजय धोटे यांना बहाल करण्यात आली.महिला संवेदिनीनी कडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
राजुरा भागात विकासगंगा पोहोचविण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे संजय धोटे यावेळी आनंदित झाले. महिला करिता राजुरा शहरात महिला बचत भवनाची निर्मिती करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. परंतु माझ्या विधानसभाचा कार्यकाळ पुर्णत्वास होऊन निवडणूक लागल्याने ते काम होऊ शकले नाहीत.त्या कार्यास सतत प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
घर-संसार-परीवार अशा नानाविध बाबींचा सांभाळ स्त्री ला करावा लागतो.ती कधिच डगमगत नाही, नियोजन करण्यात महिला मंडळी खुप प्रबळ असते.अशातही ती समाज उपक्रमात सहभागी होते ही बाब स्तुत्य आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार संजय धोटे, शिवाजी महाविद्यालय राजुरा चे प्राचार्य डॉ वरकड, यादवराव धोटे महाविद्यालयाचे प्राध्यापक गोविंद झाडे,संध्याताई संजय धोटे, अनुगामी लोकराज्य महाअभियान राजुरा भाग प्रमुख सतिश मुसळे मंचावर उपस्थित होते. बचत गटातील महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी वरीष्ट पातळीवर मी प्रयत्नरत् आहोत,महिलांची आर्थिक उन्नती होऊन ती स्वयंपुर्ण व्हावी यासाठी लवकरच राजुरा येथे बचत गटांमार्फत लघुव्यवसाय सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शन व बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे संजय धोटे यांनी सांगितले यामुळे स्थानिक महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. प्रास्ताविकेत सतिश मुसळे यांनी संस्थेचा सामाजिक उद्देश स्पष्ट केला. प्राचार्य डॉ वरकड यांनी महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदाताई वाटेकर यांनी तर आभार प्रदर्शन सविता रागीट यांनी केले. कार्यक्रमाला राजुरा नगरातील बहुसंख्य मातृशक्ती उपस्थित होत्या.