लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा व लोकसभा मतदार क्षेत्रातील नागरीकांना रेल्वेच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिला आहे. तथापि कोरोना काळामध्ये या जिल्ह्यातील प्रवाशांना मिळणाऱ्या या सोयी सुविधांमध्ये रेल्वे मंत्रालयाने अनेक महत्वपूर्ण गाड्या, अनेक स्थानकांवरील स्टाॅपेज बंद केल्यामुळे जिल्ह्यासह लोकसभा क्षेत्रातील प्रवाशांची होणारी मानसिक कोंडी दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असून या जिल्ह्याला यापूर्वी मिळणाऱ्या रेल्वे विषयक सोयी-सुविधा उपलब्ध केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही या भूमिकेचा पूर्नरुच्चार करीत सतत प्रयत्नशिलतेमुळे भांदक येथे ह निजामुद्दीन-हैद्राबाद(दक्षिण एक्सप्रेस-12721/12722) चा थांबा तसेच चंद्रपूर येथे मदुराई-चंदीगड(12687-12688) एक्सप्रेस चा नव्याने थांबा मंजूर करवून जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना हंसराज अहीर यांनी दिलासा दिला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांकरीता यापूर्वी उपलब्ध असलेल्या सर्वच रेल्वे सुविधा पुन्हा मिळवून देवू असा निर्धार हंसराज अहीर यांनी व्यक्त केला. भांदक येथे रेल्वे थांबे पूर्ववत सुरु करण्यासाठी येथील अनेक संस्था, संघटना व राजकीय क्षेत्रातील लोकांनी आंदोलन उभारले होते. सदर उपोषण सोडवित त्यांना शब्द दिला होता तो शब्द हंसराज अहीर यांनी दक्षिण एक्सप्रेस चा थांबा मंजूर करुन पाळला आहे. अनेक गाड्यांचे थांबे सुध्दा लवकरच सुरु करवून घेवू असा विश्वास त्यांनी भद्रावतीकरांना दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे सुविधांकरीता अहीर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री, राज्यमंत्री यांचेशी भेट घेवून वेळोवेळी सकारात्मक चर्चा करुन जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणींकडे लक्ष वेधत त्यांनी बंद झालेल्या गाड्या व आवश्यक थांबे पूर्ववत सुरु करण्यासाठी तसचे वर्तमानात सुरु असलेल्या मुंबई व पूणे या साप्ताहिक गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याकरीता चर्चा केली असून याबाबतही रेल्वे मंत्र्यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन हंसराज अहीर यांना दिले असून लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासादायक बातमी कळेल असेही अहीर यांनी म्हटले आहे. वरील दोन्ही एक्सप्रेस चे भांदक व चंद्रपूर येथे थांबे मंजूर झाल्याने प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.