लोकदर्शन नाशिक: 👉 राहुल खरात
फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अॅड सोशल फौंडेशन, पुणे यांच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे *सत्यशोधक समाज स्थापना दीन शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त* दि. २६ मार्च २०२३ रोजी दु.१२.०० वा. पंचवटी, नाशिक येथील गोदावरी लॉन्स मध्ये इगतपुरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुनील परिषदेचेजाधव यांचा मुलगा सत्यशोधक स्वराज जाधव ,BE.MECH आणि नाशिकचे समाजसेवक सुनील माळी यांची मुलगी धनश्री माळी, B.Com B. Ped या उच्चशिक्षिताचा मोफत ३९ वा.सत्यशोधक सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या सुविद्य पत्नी शेफाली भुजबळ आवर्जून उपस्थित होत्या. यावेळी जाधव व माळी कुटुंबीयांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
*याप्रसंगी वधू वर यांना आशीर्वाद देताना शेफाली भुजबळ म्हणाल्या की उच्चशिक्षित मुले सत्यशोधक विवाहकडे हळू हळू वळू लागलेत याचा अर्थ त्यांना महात्मा फुले यांनी 150 वर्षापूर्वी केलेले कार्य समजू लागले आहे. परंतु सत्यशोधक विवाहाची ही चळवळ ज्यावेळी शेवटच्या घटकापर्यंत पोहचेल आणि त्यांचे विचाराने कार्य घडू लागतील त्याचवेळी आपण महात्मा फुल्यांचे वारसदार समजावे. यासाठी जाधव माळी कुटुंबाने एक पाऊल पुढे टाकले त्याचे अनुकरण करून सत्यशोधक समाज स्थापना दिनाला 150 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी गावोगावी हजारो लग्न या पद्धतीने होतील असे सर्वांनी कार्य करा असा देखील मौलिक सल्ला त्यांनी याप्रसंगी दिला.*
या वधू वरांची रजिस्टर नोंदणी करून विधीकर्ते अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी या विवाहाचे साक्षीदार म्हणून शेफाली भुजबळ यांची सही घेतली व अध्यक्ष रघुनाथ ढोक व गोविंद माळी यांच्या शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम संस्थेच्या वतीने भेट दिली. तर आई- वडील, मामा-मामी यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघा तर्फे सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी अक्षता म्हणून तांदूळ ऐवजी फुलांच्या पाकळ्या वापरण्यात आले. तर महात्मा फुले रचित मंगलाष्टकांचे गायन माळी समाज विकास संस्था वधू-वर सुचक केंद्रांचे अध्यक्ष हनुमंत टिळेकर व दीपक मंडलिक यांनी केले. यावेळी सुरुवातीला स्वराज व धनश्री यांच्या हस्ते फुले दाम्पत्य यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला तर आई वडिलांच्या हस्ते शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि वधूचे मामा सी. आय. डी. विभागाचे अधिकारी बाळकृष्ण खैरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत हे कार्य आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जावू असे आश्वासन दिले. या सोहळ्यास मोलाची मदत समाधान जेजुरकर, गोविंद माळी, पत्रकार राहुल खरात यांनी केली. यावेळी विशेष करून मोठ्या संख्येने शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.