लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शहरात असलेल्या अल्ट्रा टेक सिमेंटच्या प्रदूषण मुळे येथील व परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत, धुळीमुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहेत,अनेकांना विविध प्रकारच्या आजाराने ग्रासले आहेत, प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन ने पुढाकार घेऊन कंपनी वर कठोर कारवाई करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय विश्रामगृह समोर 24 मार्च पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहेत,
या आंदोलनात मनसे चे कोरपना तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बोरकर,तालुका उपाध्यक्ष राजू चौधरी,विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष ऋषिकेश भारती,वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष निनाद बोरकर,गडचांदूर शहर उपाध्यक्ष सिद्धेश्वर केंद्रे,भास्कर लोहबडे,राजू खटोड,व इतर सहभागी झाले आहेत,
या आंदोलनाला जनसत्याग्रह चे नेते आबीद अली, शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष संतोष पटकोटवार, नगरसेवक रामसेवक मोरे,गोपाल मालपाणी, प्रदीप गुडेल्लीवर, मनोज भोजेकर, मनोज सिंग,राकेश खेवले,अंकित पुरके आदींनी जाहीर पाठिंबा दिला आहे,
आंदोलन सुरू करण्याबाबत चे निवेदन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत,