लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च चे औचित्य साधून कोरपणा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा येथे दालमिया सिमेंट कंपनीचा सीएसआर विभाग, दालमिया भारत फाउंडेशन च्या वतीने टीबी रुग्णाला सकस आहार किट जिल्हा परिषद चंद्रपूर चे .मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विवेक जॉन्सन यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.
जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विवेक जॉन्सन हे कोरपणा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत, अंगणवाडी ,जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या .त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा येथे त्यांच्या हस्ते क्षय रुग्णाला सकस आहार किट वाटप करण्यात आली.
सन 2025 पर्यंत संपूर्ण भारत टीबी मुक्त करायचा आहे त्यामुळे संशयित टीबी रुग्णांना शोधून त्यांचे आजाराचे निदान करून त्यांना उपचाराखाली आणणे सुरू आहे. तसेच त्या उपचार कालावधीत त्यांना सकस प्रोटीन युक्त आहार मिळावा याकरता समाजातील दानशूर लोक, प्रतिष्ठित मंडळी, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संस्था ,औद्योगिक कंपनी यांच्यामार्फत सहा महिने ते एक वर्ष या कालावधीसाठी प्रत्येकी एक रुग्णाला दत्तक घेऊन आहार किट देण्याचा उपक्रम राबवल्या जात आहे त्याचाच एक भाग म्हणून दालमिया सिमेंट कंपनी नारंडा यांनी त्यांच्या सीएसआर कार्यक्षेत्रातील सहा रुग्णांना दत्तक घेतले आहे व त्यातील एका रुग्णाला आज आहार किट वाटप करण्यात आली यावेळी कोरपणा व जिवती तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे, प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीक्षा ताकसांडे ,डॉ.सुबोध गोडबोले आरोग्य सहाय्यक श्री टोंगे ,श्री कन्नाके ,श्रीमती मारोतकर ,औषध निर्माण अधिकारी श्री साउरकर व इतर कर्मचारी उपस्थित होते. दालमिया भारत फाउंडेशनचे श्री प्रशांत भिमनवार व कोरपणा टीबी विभागाचे श्री.पारखी श्री. हिरेमठ यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन केले.
,