लोकदर्शन 👉 मोहन भारती
गोंडपिपरी :– गोंडपिपरी तालुक्यातील मौजा सुकावासी ग्रामपंचायत वाटरणा 97 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जलजीवन मिशन योजने अंतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना ८७ लक्ष रुपये आणि मौजा सुकवसी गावा अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे १० लक्ष रुपये, तसेच जिल्हा परिषद शाळे मध्ये डिजिटल रूम इत्यादी विकासकामांचा समावेश आहे. या प्रसंगी सुकवासी गावामध्ये प्रथम अगमना प्रसंगी संपूर्ण गाव उपस्थित राहून आमदार मोहदयाचे मोठ्या उत्साहाने झेलीम, रॅली काढून स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद शाळे ला आमदार निधी अंतर्गत रंगमंच, आणि २ संगणाक आपण देऊ. यावेळी गावातील नामदेव लेनगुरे आणि पत्रूजी लेनगुरे यांनी आपली जमीन दान दिली त्याबद्दल आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, सरपंच सौ सूनंदाताई मोहुर्ले, गट विकास अधिकारी शालीक माऊलीकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, माजी सभापती अशोक रेचनकर, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, अध्यक्ष सरपंच संघटना देविदास सातपुते, महिला तालुकाध्यक्ष रेखा रामटेके, सोनू दिवसे, श्रीनिवास कंदणुरीवार, धिरेंद्रे नागपुरे, गिरिधर कोटणाके, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पुरुषोत्तम चौधरी, अध्यक्ष माळी समाज बंडूजी आदे, जिल्हा परिषद शिक्षक रामेश्वर पातसे, ज्ञानेश्वर देवतळे, ग्रामसेवक नागरगोजे, इंद्रजित नीकोडे, प्रदीप लेनगुरे, कोंडू शेंडे, निर्मला कंनके, अरुणा कावळे, ओम लेनगुरे, अरुणा चौधरी, शालू लेनगुरे यासह गावातील तरुण युवक, महिला, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड सचिन फुलझले यांनी केले तर आभार प्रदर्शन बंडू मोहूर्ले यांनी मानले.