लोकदर्शन 👉 मोहन.भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जागतिक चिमणी दिन’ सर्वत्र साजरा होत असतानाच चिमण्या लुप्त होण्यामुळे पर्यावरणापुढे अनेक धोके उभे राहिले आहेत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणे महत्वाचे आहे. आपलं जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रम्य करण्यासाठी चिऊताई नक्कीच हवी. आपल्या किलबिलाटानं आयुष्याचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिऊताईचं अस्तित्व अन् वैभव जपणं म्हणूनच गरजेचं आहे. सध्या देशभरातील चिमण्यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील अनेक जाती तर इतिहासजमा झाल्या आहेत. ‘पासर डोमेस्टीकस’ अर्थातच ‘हाऊस स्पॅरो’ ही चिमण्यांची जात सर्व जगभरात आहे. जगभरात 26 जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. मात्र या 26 पैकी फक्त 23 चिमण्यांची छायाचित्र सध्या उपलब्ध आहेत. चिमण्या लुप्त होण्यामुळे पर्यावरणापुढे अनेक धोके उभे राहिले आहेत. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरातील तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव झालीय. उन्हाचा दाह वाढल्याने या पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी पाण्याच्या बाटल्या प्रत्येक वृक्षाला लावण्यात आल्या….गडचांदूर येथे ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला ,या वेळी वृक्ष प्रेमी महेश देरकर, नयन मालेकर, स्वप्नील माणूसमारे, अजित उरकुडे ,सर्वध वणकर, आणि शाळेतले काही चिमुकले मुले उपस्थित होते..
,