लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकंर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
औद्योगिक शहर गडचांदूर येथील राष्ट्रीय महामार्ग वर सावित्रीबाई फुले शाळेजवळ असलेल्या चौकात गेल्या काही वर्षांपासून देशी दारू दुकान सुरु केले आहे, परिसरातील नागरिकांचा विरोध असताना सुद्धा हे दारू दुकान सुरु असल्याने सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना, अतोनात त्रास सहन करावा लागत आहे, या मार्गावर दिवस रात्र वाहतूक सुरू असते,पहाटेपासूनच या ठिकाणी दारू पिणाऱ्या माणसांची गर्दी असते,बरेचदा रोड च्या बाजूने पडलेले दिसतात,भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाहीत, तेव्हा प्रशासन ने या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन महामार्ग वरील देशी दारू दुकान हटवून दुसरीकडे स्थलांतर करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष सिद्धेश्वर केंद्रे यांनी जिल्हाधिकारी कडे निवेदनात केली आहेत,
गडचांदूर शहरात देशी, विदेशी दारु दुकाने भरपूर प्रमाणात असताना पुन्हा नवीन दारू दुकानाला परवानगी दिली जात असल्याचे कळते तेंव्हा नवीन दारू दुकानाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी विनंती निवेदनात केली आहे,
प्रशासन ने कारवाई केली नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे,निवेदनाच्या प्रति जिल्हा पोलीस अधीक्षक,उत्पादन शुल्क विभाग,नगर परिषद मुख्याधिकारी,पोलिस निरीक्षक,गडचांदूर यांच्याकडे सोपविण्यात आल्या आहेत