लोकदर्शन.👉 मोहन भारती
गडचांदूर-
सेवा सहकारी संस्था गडचांदूर ची निवडणूक 16 मार्च रोजी पार पडली व त्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी चे 13 पैकी 8 उमेदवार विजयी झाले. शेतकरी संघटना – भाजपा युतीच्या 5 जागा निवडणूक आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते अरुण निमजे यांच्या मार्गदर्शनाखाली व काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते नोगराज मंगरुळकर, विठ्ठल थिपे, सचिन भोयर यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली. या निवडणुकीत अनिल नागपुरे ,चंदन गावंडे,टिकाराम चिवाने,रंभाबाई गेडाम, जमुना बाई मेश्राम, मारोती कोडापे,गुलाब पेंदोर, दादाजी मेश्राम हे उमेदवार विजयी झाले.
विजयी उमेदवारांचे अभिनंदन आ.सुभाष धोटे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, न.प.चे उपाध्यक्ष शरद जोगी, बाबा गोरे, प्रवीण कोल्हे, काँग्रेस चे गटनेते विक्रम येरणे, नगरसेवक अरविंद मेश्राम, काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष महाडोळे, उमेश राजूरकर, नानाजी आदे, प्रा. आशिष देरकर, शैलेश लोखंडे,अनिल निवलकर, पुरुषोत्तम मेश्राम, अनिल झाडे, रवींद्र चौधरी, दिलीप राऊत, दिलीप केळझरकर, सचिन क्षीसागर, मनोज चौधरी, शामराव विधाते, दिलीप परसुटकर, बाबुराव गोहणे, अतुल गोरे, मयूर एकरे, तुकाराम चिकटे,अनिल सिडाम काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिकांनी केले