लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 13
उरण पूर्व विभागातील क्रिकेटची पंढरी ओळखली जाणाऱ्या पिरकोन येथील धोंडू काका मैदानावर सीएचए प्रेमिअर आधार चषकाच्या आयोजनाप्रसंगी साईभक्त रवीशेठ पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सीएचए संघटना हि भावी आयुष्यासाठी कार्यरत असून या संघटनेला आम्हा उपस्थितांकडून हवे ते सहकार्य देऊ. असे सांगत सोन्यासारखी सीएचए संघटना हिऱ्यासारखी चमकू दे अशी भावना रवीशेठ पाटील यांनी सर्वांसमोर व्यक्त केली.साई मंदिर वहाळचे संस्थापक रवीशेठ पाटील,रायगड भूषण राजू मुंबईकर,माजी आमदार मनोहरशेठ भोईर, सरपंच विशाखा ठाकूर, प्रशांत ठाकूर,बाळूशेठ फडके (लायन ग्रुप विहीवली),उरण तालुका मनसे अध्यक्ष सत्यवान भगत, संदिप म्हात्रे (पाले ), मंगेश म्हात्रे (पाले ), नरेंद्र मुंबईकर, शशिकांत म्हात्रे, जयेश खारपाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत,गुरुनाथ गावंड,सरपंच निराताई पाटील, तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, ऍड. निनाद नाईक, ऍड. प्रशांत पाटील,सरपंच भारत भोपी,सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास पाटील, विवेक म्हात्रे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सीएचए आधार चषकाचे उदघाटन झाले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन सुनील वर्तक यांनी केले.
उरण पूर्व विभागातील सीएचए संघटनेमार्फत पूर्व विभागातील सतत होत असलेल्या अपघातग्रस्तांसाठी अपघातग्रस्त निधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रविवार दि 12 मार्च 2023 रोजी सीएचए चषकाचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक – ग्लोबल एक्सप्रेस मल्टीलॉजिस्टिक, द्वितीय क्रमांक -थ्री स्टार ट्रिपल एस आवरे यांनी पटकविला.सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी न्हावा शेवा सीएचए संघटनेचे अध्यक्ष रुपेश भगत, उपाध्यक्ष हनुमान म्हात्रे, सचिव दिनेश पाटील, हरिश्चंद्र म्हात्रे, सल्लागार बाळकृष्ण शेडगे, सुरेंद्र म्हात्रे, दिपक गावंड, जनार्दन कडू, खजिनदार संदिप पाटील, किरण म्हात्रे, मिलिंद म्हात्रे, सहसचिव नरेंद्र पाटील, संघटक श्याम गावंड, संपेश पाटील, सचिन केदारी, दिनेश म्हात्रे, जितेंद्र भगत, समाधान पाटील यांच्यासह प्रत्येक गावचे गाव अध्यक्ष, न्हावा शेवा सीएचए संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.आधार चषकाच्या माध्यमातून आजपर्यंत जमा झालेल्या निधीतून मृत्युमुखी पडलेल्या 4 सीएचए बांधवांना 584500 एवढी मदत तर अपघातात जखमी झालेल्या बांधवाना 201000 एवढा निधी देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रुपेश भगत यांनी दिली.