कालीमाटी येथे कृषिदूत मार्गदर्शन कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न*

 

लोकदर्शन लांजी ( बालाघाट: मध्यप्रदेश),👉प्रा.अशोक डोईफोडे

ज्ञानप्रकाश लोकसंस्था आणि सत्यक्रांती बायो अॅग्रो व्हिजन द्वारा शेतकरी विकास अभियान अंर्तगत जैविकशेती जागृती आणि स्वंयरोजगार निर्मिती हा प्रमुख उद्देश केंद्रबिंदू ठरवून कृषिदूत मार्गदर्शन कार्यशाळा मध्यप्रदेशातील कालीमाटी जि.बालाघाट येथे यशस्वीपणे संपन्न झाली. कार्यक्रमाचे आयोजन विकास संस्थान,हिर्री त. किरनापूर द्वारा करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उट्घाटन कालीमाटीच्या सरपंच सौ. आशा घोरमारे यांनी केले तर प्रास्ताविक खादी ग्रामउद्योग आयोगाचे बि.सी. मंडलवार यांनी मांडले. सदर महत्वपूर्ण कार्यक्रम
जैविकशेतीचे प्रयोगशिल शेतकरी आणि माजी आमदार स्वर्गीय भागवतभाऊ नागपूरे यांना श्रद्धापूर्वक श्रद्धांजली स्वरुपात अर्पण करण्यात आला आणि त्यांच्या यशस्वी दिशादर्शी प्रयोगाची माहिती सर्वांपर्यत पोहचविण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमात रासायनिक खत -औषधींचे दुष्परीणाद्वारे नष्ट होत चाललेल्या सुपिकतेला वाचविणे, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणे त्याच प्रमाणे गरजू आणि ईच्छूक बेरोजगारांना स्वंयरोजगाराची निर्मिती करणे इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर सामाजिक कार्यकर्ते शेतकरी विकास अभियानचे मुख्य संयोजक श्रीपत राठोड, नागपूर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमात लांजी तालुक्यातील उर्जा संरक्षणासाठी कार्यरत खादी ग्रामोद्योग बायोगॅस निर्मिती प्रकल्पातील सक्रीय कार्यकर्ते, प्रकल्प संचालक यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांचा विशेष सहभाग होता.
या महत्वपूर्ण कार्यक्रमात, ” आरोग्यसंपन्न परिवारांसाठी परसबाग निर्मिती,, या विषयांवर सातव्या व आठव्या वर्गात शिकणाऱ्या अंजली राठोड व दिपाली राठोड यांचे विशेष मंत्रमुग्ध करणारे प्रभावी सादरीकरण झाले हे विशेष.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्यक्रांतीच्या सौ. जयश्रीताई राठोड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *