लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर / यवतमाळ – महिलांनी राजकारणात अधिकाधिक संख्येने सहभाग घेवून समाजकारणाला वाहुन घ्यावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी महिलांच्या सन्मानात भर घातली आहे. मातृशक्तीचे देशाच्या विकासात पुरुषांबरोबर योगदान असल्याने महिलांनी यापुढे ‘चुल आणि मुल’ या पुरते मर्यादित न राहता आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यास स्वतःला सक्षम करावे असे आवाहन *राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर* यांनी केले.
*भाजपा महिला आघाडी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने पोंभुर्णा येथिल किरण राईस मिल च्या पटांगणावर दि. 12 मार्च, 2023* रोजी आयोजित महिला मेळाव्यास ते संबोधित करीत होते. या मेळाव्यास जि. प. च्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनूले, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा वनिताताई कानडे, प्रदेश सचिव सुरेखाताई लुंगारे, प्रमुख वक्त्या भावनाताई चांभारे, भागवताचार्य अनुमपमाताई पिंपळकर, प्रदेश सदस्या रेणुकाताई दुधे, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष अल्काताई आत्राम, महामंत्री वंदना आगरकाटे, विजयालक्ष्मी डोहे, सायरा शेख, रत्नमाला भोयर, नगरपंचायत अध्यक्षा सुरभीताई पिपरे, भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपूरे, राहुल संतोषवार, बबन निकोडे, अर्चना जिवतोडे, कल्पना बोरकर, किरण बुटले, हरीश ढवस, विनोद देशमुख, ज्योतीताई बुरांडे, गंगाधर मडावी, अजय मस्की आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
*गांव चलो, घर घर चलो अभियानात स्त्री-शक्तीने हिरीरिने सहभागी व्हावे.*
मार्गदर्शन करतांना हंसराज अहीर यांनी सांगितले की, प्रधानमंत्री मोदीजींनी मुस्लिम महिलांना न्याय व सन्मान मिळवून देण्यासाठी तीन तलाक कायदा रद्द केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार सामाजिक विषमता संपविण्याकरिता कायदे केले. महिला आरक्षणाचा अवलंब व्हावा, महिलांना अधिकाधिक प्रतिनिधीत्व करता यावे म्हणुन राज्य व केंद्र सरकारची भुमिका ही नेहमीच महिलाधारित आहे. मोदीजींनी महिलांसाठी बचतगट, उज्वला गॅस योजना, जनधन योजना बॅक खात्यांसह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व विविध क्षेत्रात अनेक योजना कार्यान्वित करुन महिला सशक्तीकरणाचे कार्य केले. भाजपाच्या गांव चलो, घर घर चलो अभियानात महीलांनी हिरीरिने सहभागी होण्याचे आवाहन केले.