लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर / यवतमाळ – ब्रिटीश शासकाच्या दमणकारी सत्तेविरुध्द बंडाचे निशान फडकविणारे क्रांतिकारी, शहीदवीर बाबुरावजी शेडमाके हे आमचे आदर्श आहेत. गरिब कुटूंबातून आलेल्या या आदिवासी शुर योध्याची राष्ट्रभक्ती व त्यांनी गाजविलेला शौर्याचा इतिहास आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी असुन त्यांच्या त्याग व समर्पणाच्या कार्यातून प्रत्येकाने स्फुर्ती घेवून देशकल्याणात योगदान द्यावे असे आवाहन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी केले.
स्थानिक जिल्हा कारागृहातील वीर बाबुरावजी शेडमाके यांच्या शहीद स्थळावर दि. 12 मार्च, 2023 रोजी जयंतीदिनाचे औचित्य साधून शहीदवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत आदरांजली वाहतांना हंसराज अहीर बोलत होते. या कार्यक्रमास माजी महापौर अंजली घोटेकर, रवि गुरनूले, गणेश गेडाम, प्रमोद बोरीकर, विनोद शेरकी, धनराज कोवे, अरविंद मडावी, माजी नगरसेविका ज्योती गेडाम, माया उईके, शीतल आत्राम, चंद्रकला सोयाम, शितल कुळमेथे, देवानंद वाढई, साईराम मडावी, रवी मेश्राम, नरेंद्र मडावी, कमलेश आत्राम, बाबुराव जुमनाके, नथ्थु गेडाम, विठ्ठल कुमरे, श्याम गेडाम, सचिन मरसकोल्हे, अमर मडावी, सोनु गेडाम, राजेंद्र तिवारी, प्रशांत चौधरी, रवि लोणकर, दिनकर सोमलकर, सचिन कोतपल्लीवार, अरुण तिखे, प्रदिप किरमे, पुनम तिवारी, गौतम यादव, किशोर बावणे, यशवंत सिडाम, किशोर आत्राम, गीता गेडाम, सीमा मडावी, मोनिका मडावी, त्र्यंबकेश्वर गेडाम, राकेश आत्राम, अनिता पुसाम, कमलेश आत्राम, रुद्रनारायण तिवारी, प्रलय सरकार, जयश्री आत्राम, कृष्णा गेडाम, विक्की मेश्राम, बंडु गौरकार, प्रीती दडमल, कृष्णा मेश्राम, नितिन करीया, राजेश यादव, गुड्डु यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले की बाबुरावजी शेडमाके हे चंद्रपूर जिल्ह्याचे गौरव आहेत. त्यांच्या क्रांतीकार्याचा इतिहास सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. केवळ आदिवासी बांधवाकरिताच बाबुरावजी शेडमाके श्रध्दास्थान नसुन प्रत्येक समाजाला ते श्रध्दास्थानी आहेत. ब्रिटीशांच्या सत्तेविरुध्द लढा देणारे देशभक्त हे सर्वांसाठी सदैव पुज्यनीय असुन त्यांच्या प्रेरणेतून राष्ट्राच्या उत्कर्षाकरिता योगदान देणारे अनेक योध्दे या मातीत निर्माण झाले आहे असेही हंसराज अहीर म्हणाले. यावेळी शहीदवीरांच्या जयंतीपर्वावर निघालेल्या भव्य रॅलीचे त्यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास आदिवासी बांधव, भाजप पदाधिकारी, महानगरातील अनेक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.