लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 11 आजच्या धक्काधक्कीच्या व जीवघेण्या स्पर्धेचा युगात अनेक महिलांचे आपल्या आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महिलांच्या विविध रोगात लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. महिलांच्या विविध समस्या व महिलांना होणारे विविध आजार लक्षात घेउन स्त्रियांच्या आजार व रोगावर उपाय योजना करण्याच्या दृष्टीकोणातून सोनारी ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष राकेश कडू यांच्या माध्यमातून सोनारी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे 11 मार्च 2023 रोजी महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन सोनारीच्या सरपंच पूनम कडू यांनी फीत कापून केले.यावेळी डॉ कृष्णा बोरकर यांनी महिलांची मासिक पाळी या विषयावर मार्गदर्शन केले. गर्भाशयाचा कर्करोग, स्तन कर्करोग आदी महिलांच्या विविध रोगांवर यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी थोईरॉईड, कोलेस्ट्रॉल, शुगर,सीबीसी, हिमोग्लोबिन ची मोफत तपासणी करण्यात आली. लुपीन डायग्नोस्टिक पीयुपी ज्योती क्लिनिक सोनारी यांच्या मार्फत मोफत ब्लड तपासणी करण्यात आली तर ब्लू क्रॉस फार्मा तर्फे शुगरची मोफत तपासणी करण्यात आली. उपस्थित स्त्रियांना मोफत सल्ला देऊन स्त्रियांची तपासणी करुन स्त्रियांना मोफत गोळ्या औषधे देण्यात आले .या प्रसंगी डॉ कृष्णा बोरकर, (स्त्री रोग तज्ञ बोरकर मदर केअर हॉस्पिटल उलवे )डॉ मीना बोरकर, डॉ आरती म्हात्रे, डॉ हरिओम म्हात्रे, डॉ नम्रता कडू, डॉ. दिव्या कडू, ग्रामसुधारणा मंडळ सोनारीचे अध्यक्ष राकेश कडू, उपाध्यक्ष -रविंद्र तांडेल, खजिनदार धर्मेंद्र कडू, सेक्रेटरी साहिल कडू आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन चेतन पाटील यांनी केले. आजपर्यंत महिलांसाठी असे आरोग्य शिबीर कधीही घेण्यात आले नाही. मात्र राकेश कडू यांनी सर्वप्रथम आरोग्य शिबीर व मार्गदर्शन शिबीर ठेवून महिलांच्या आरोग्याची उत्तम काळजी घेतली. आरोग्य शिबीर ठेवले. असा उपक्रम गावात पहिल्यांदा राकेश कडू यांनी राबविला. स्त्रियांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला असे सांगत सरपंच पूनम कडू यांनी तसेच महिला ग्रामस्थांनी राकेश कडू यांचे आभार मानले.