लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर –
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रासेयो विशेष शिबिर जिल्हा स्मार्ट ग्राम बीबी या ठिकाणी आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण व मतदार जनजागृतीसाठी युवाशक्ती या संकल्पनेवर आधारित घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तुळशीरामजी पुंजेकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नामदेवराव बोबडे, माधवराव मंदे, प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, सरपंच सौ माधुरी टेकाम, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, पोलीस पाटील राहुल आसुटकर, प्रा. डॉ. संजय गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा. डॉ. श्याम खंडारे यांनी रासेयोचे महत्व व विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर शिबिरात रक्तगट तपासणी, बीपी, शुगर तपासणी, पशु चिकित्सा शिबिर ग्रामस्थांसाठी आयोजित करण्यात आले. तसेच ग्राम विकासात युवकांची भूमिका, कर्करोग कारणे व परिणाम, लोकशाहीच्या बळकटीसाठी युवकांची भूमिका या विषयावर अनुक्रमे प्रा. गुरुदास बलकी, डॉ. संजय गाथे, जितेंद्र बैस, डॉ. संजय गोरे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिरात बीबी गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. पर्यावरण विषयावर बालकांची चित्रकला स्पर्धा व महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. तसेच ग्रामस्थांसाठी आकाश तावीडे अमर तावीडे यांचा समाज प्रबोधन पर किर्तन चा कार्यक्रम घेण्यात आला
सदर शिबिराच्या समारोप कार्यक्रमात प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी उपसरपंच आशिष देरकर यांनी शिबिराच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे आभार मानले. प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांनी शिबिरातील उपक्रमाची दखल घेऊन आआपल्या भाषणातून शिबिरार्थ्याचे कौतुक केले.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अहवाल वाचन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शरद बेलोरकर यांनी तर आभार प्रा. डॉ. माया मसराम यांनी मानले. समारोपीय कार्यक्रमात चित्रकला व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व शिल्ड देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी आसमा पठाण, प्रा. डॉ. संजय गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय गडचांदूर, पशु चिकित्सा रुग्णालय आवारपुर, बीबी ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी सदस्य व कर्मचारी, जि. प. उच्च प्राथमिक शाळा बीबी चे शिक्षक, पोलीस पाटील व शिबिरातील सर्व सहभागी रासेयो स्वयंसेवक, तसेच प्रा. मंगेश करंबे प्रा. डॉ. सत्येंद्र सिंह, सुभाष टेकाम, धर्मराज पोहाणे आदी मंडळीचे सहकार्य लाभले.