लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना :– राष्ट्रिय आरोग्य अभियााअंतर्गत जिल्हा परिषद चंद्रपूर तालुका कोरपना आणि जिवती यांच्या वतीने बालाजी सभागृह, गडचांदूर येथे जागतिक महिला दिन व आशा दिनानिमित्त स्नेहमिलन, सांस्कृतिक महोत्सव व तालुक्यातील ग्रामीण स्तरावरील आशास्वयंसेविका व गटप्रवर्तकांसाठी विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. तसेच तालुका स्तरिय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना आ. सुभाष धोटेंच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, कोरोना काळात ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका अतिशय पोटतिडकीने व जबाबदारीने काम करीत होत्या. संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी, बिगर आदिवासी क्षेत्रात, ग्रामीण, शहरी भागात दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका आशास्वयंसेविका पार पाडतात. शासकीय योजनांचे लाभ गरजू लाभार्थीच्या घराघरापर्यंत पोहोचवतात. बर्याच दिवसांपासून यांचे आंदोलन सुरू होते. आम्ही पाठिंबा देऊन स्वतः सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊन मागण्या मान्य कराव्यात यासाठी प्रयत्न केलेत. राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनात त्याची दखल घेऊन काही प्रमाणात वेतनात वाढ करण्यात आली आहे. या पुढेही आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू.
या प्रसंगी नगराध्यक्षा सविता टेकाम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे, वैद्यकिय अधिकारी डॉ. संजय घाटे, महिला व बालविकास अधिकारी गणेश जाधव, डॉ. बावणे, डॉ. कुरेशी, डॉ. शर्मा, डॉ. करोने, डॉ. काकळे, डॉ. ताकसांडे, डॉ. शेख, जिवती व कोरपना तालुक्यातील आशास्वयंसेविका व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचालन प्रेमचंद वाकडे यांनी तर आभार प्रदर्शन ए. एन. निंबाळकर यांनी केले.