ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॅक लिस्टेड करून अफरातफरी आणि शासनाचे पैसे लुटले म्हणुन गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. .!

 

लोकदर्शन (भिवंडी👉-प्रतिनिधी नागेश निमकर)

भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका या ठिकाणी भूगारी गटार योजनेसाठी स्किम फेस-२, भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका भिवंडी अंतर्गत सुवर्ण जयंती नगरोधान अभियान अंतर्गत भिवंडी महापालिकेला सामनेवाले यांच्या माध्यमातुन भुयारी गटार योजनेचे योग्य प्रकारे व नियोजनबाद भिवंडी शहरातील मलनिसारणाचे काम करायचे म्हणुन कन्सलटन व सरकारकडून देखरेख म्हणुन सामनेवाले १ ते ५ यांची नेमणुक केले होते. कुठलेही योग्य नियोजन न करता सदरची योजना राबवण्यात आलेली आहे. सदरची योजना राबवत असतांना सदर योजनेसाठी निघालेली निविदा ही ४६२ कोटीची असून या ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीला शासनाचे पैसे लुटण्यासाठी सोयीस्कररीत्या ४६२ कोटीची निविदा देण्यात आली. त्यामध्ये वरीलप्रमाणे सामनेवाले हे गैरव्यवहारातून गैरलाभ मिळवण्यासाठी व भूयारी गटाराची कामे होण्यातत्पुर्वीच गैरव्यवहाराच्या माध्यमातून मोठे मोठे धनादेश शिफारसीने मंजुर केलेले आहे. भूयारी गटार योजना ही फसवी व बनावट निघालेली असुन सामनेवाले अधिकान्यांना गडगंज अमाप संपत्ती मिळवण्यासाठी व ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी एवढे पैसे नगरपालिका प्रशासनाने मंजुर करुन भिवंडी महापालिकेला दिलेले आहे. परंतु वरील सामनेवाले १ ते ४ यांनी मिळुन या पैश्यांसाठी कागदपत्र खेळवून शासनाची निविदा रक्कम गैरव्यवहारातून गैरमार्गाने बिले उपटून स्वतःची घरे भरलेली आहेत. भूयारी गटार योजनेचे ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीने धांदात निकृष्ट दर्जाचे काम केलेले असुन त्यांनी फक्त एक फुटी रुंदीचे पाईप जमिनीखाली मलनिसारणासाठी घातलेले आहे आणि त्या मलाचे निःसारण होण्यासाठी जागोजागी विटबांधकामाने चैंबर निकृष्ट दर्जाचे चेंबर बनवले असुन सर्व चेंबर एका वर्षातच भूईसपाट झालेले आहे आणि संपूर्ण डांबरी रस्ता उखडून जागोजागी खड्डे पाहुन ठेवलेले आहेत, डांबरी रस्त्यांचे चाळण करून ठेवलेली आहे. त्यामुळे गेल्या २ वर्षात भिवंडीमध्ये २००० अपघात होऊन चाळीस एक माणसे मृत्युमुखी पडलेले आहेत तर काही एक कोमामध्ये गेलेले आहे तर काहीचे हाथपाय तुटलेले आहेत, त्याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदारसह संबंधित सामनेवाले १ ते ५ अधिकारी आहेत, तसेच भिवंडीत वेळोवेळी गरोदर महिला डायग्नोसिस मध्ये सोनोग्राफी करण्यासाठी जात असतात, त्यांनासुध्दा असंख्य मनस्ताप होऊन त्यांचे वेळेपूर्वीच ऑपरेशन झालेले आहे, त्याससुध्दा हेच अधिकारी जबाबदार आहेत. तर गेल्या पावसाळ्यात सदर चेंबरमधुन जागोजागी रस्त्यावरती चेंबर पावसाच्या पाण्याने भरल्यामुळे मल मुत्र रोडवर पसरून रोगराई, दुर्गंधी पसरवण्याचा काम सदर ठेकेदाराने व सामनेवाले १ ते ५ यांनी यांच्या संगनमताने झालेले आहे. भिवंडी शहराला मुर्दाड शहर समजुन या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी ४६२ कोटीचे डल्ला मारून, दरोडा टाकुन पलायन केलेले आहे, अजुनही सदर मलनिसारणाचे नियोजन होण्यासाठी ६ एचटीपी व १० पंपींग स्टेशनची आवश्यकता आहे, याचा खर्चच १८० कोटीचा आहे. सगळे रस्ते ठेकेदार इंगल कन्स्ट्रक्शन कंपनीने उखडून टाकले असून रस्त्यांची चाळण केलेली आहे. सामनेवाले संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून गैरलाभ मिळवल्याने ते चिडीचूप बसलेले आहेत. त्यामुळे भिवडी महापालिकेच्या आजच्या दुर्दशेला सामनेवाले अधिकारी व ठेकेदार इंगल कन्स्ट्रक्शन कंपनी हे आहेत, सदर कंपनीने सदर भूयारी गटार योजना ही बकवास व बनावट करून ठेवली असुन या निविदे प्रक्रियेपासून ते निकृष्ठ झालेले कामापर्यंत ठेकेदार इंगल कन्स्ट्रक्शन कंपनी व सामनेवाले अधिकारी यांनी सोयीस्करपणे आपसांत निविदेचे रक्कम वाटून घेतलेले आहे, येत्या पावसाळ्यापर्यंत एवढ्या मोठ्या शहरासाठी ६ एचटीपी व १० पंपींग स्टेशनची गरज आहे, हे जर येत्या पावसाळयापर्यंत पुर्ण झाले तरी जमिनीखाली जे ड्रेनेज पाईप टाकले आहे त्यामध्ये आता संपुर्ण माती कचरा, पालापाचोळा भरल्याने संपुर्ण मलमुत्र रोडवर येऊन दुर्गंधी व रोगराई पसरणार आहे, हि घाणेरडी परिस्थिती सामनेवाले अधिकाऱ्यांनी करून ठेवलेली आहे, कारण ठेकेदाराने सोयीस्कररीत्या ३३७ करोडचे बिले काढण्यासाठी या अधिकाऱ्यांना सोयीस्कररीत्या गैरलाभ पोहोचवलेला आहे. गेल्या १० वर्षातला हा भिवंडीतील सर्वांत मोठा भूयारी गटार योजना घोटाळा असुन यामध्ये मागील व पुढील तात्कालीन व विद्यमान सर्व अधिकारी चिडीचूप आहे कारण ठेकेदाराने यांना मोठ-मोठे गलेलठ्ठ गिफ्ट दिलेले आहेत. तरी सदर भूयारी गटार योजनेसाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या आयपीएस अधिकारीमार्फत चौकशी होणे आवश्यक आहे. भिवंडी महानगरपालिकेत आयुक्त किया उपायुक्त अथवा नगररचना अधिकारी कधीही भिवंडीच्या भवितव्यासाठी बदली घेऊन येत नसतात, मोठी रक्कम देऊन भिवंडीमध्ये बदली घेऊन येत असतात आणि डोक्यांवर महाभारतातील गांधारीची पट्टी लावतात कारण जे लोक एखादया अनियमित कामाविषयी तक्रार करत असतील तर त्याला कानाडोळा करून त्यामध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार करत असतात व पैसे जमा करून दोन ते तीन वर्षात बदली होऊन रफूचक्कर होतात आणि या अशा अधिकाऱ्यांमुळे आमच्या भिवंडी महानगरपालिकेचे दिवसेंदिवसा दुर्दशा निर्माण होत चाललेली आहे कारण शेतकरी किंवा आदिवासी शेतकरी त्याचे आरक्षित जमिनीचे भूसंपादनाचा मोबदला नगररचना विभागाकडे मागावयास गेल्यास त्यांच्याकडून गैरलाभ होत नसल्यामुळे हे अधिकारी त्यांच्यासमोर असंख्य अडचणी, असंख्य त्रुट्या काढून त्यांना नाहक त्रास देत असतात व शेतकऱ्यांच्या जमिनी २०-२० वर्ष आरक्षणाखाली डांबुन ठेवतात अशी घाणेरडी व्यवस्था या महानगरपालिकेची आहे आणि भिवंडीची घाणेरडी अवस्था या ठेकेदारांनी व सामनेवाले अधिकाऱ्यांनी करून ठेवलेली असुन याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदारासह सामनेवाले अधिकारी हे आहेत. या अधिकाऱ्यांची संपत्तीची कसून चौकशी झाली पाहिजे आणि यांनी यांच्या नातेवाईकांच्या नावावरती कुठे-कुठे प्रॉपर्टी घेऊन ठेवले आहेत, पोलिसांच्या गोपनीय चौकशीतून नक्कीच समोर येईल, तरी या भुयारी गटार योजनेचे ४६२ कोटी रुपये लुटून दरोडा टाकुन भिवंडीच्या जनतेच्या विकासकामांना हरताळ फासलेले आहे, ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीने बहुतांश ईतर महापालिकेतसुध्दा भूयारी गटार योजनेचे टेंडर घेतलेले आहे, त्या सर्व ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने त्या कंपनीस ब्लॅक लिस्टेड करुन अफरातफरी व शासनाचे पैसे लुटले म्हणुन त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याच्याकडुन शासनाचे नुकसान झालेल्या पैश्याची वसुली करण्यात यावी व शासनाने या सर्वात मोठ्या घोटाळ्यावरती गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांच्या विरुद्ध कठोर ती कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच नुसते यांच्यावरती निलंबनाची कार्रवाई न करता यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांच्या संपत्तीची कसून चौकशी करावी. हि विनंती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *