लोकदर्शन पवनी 👉 अशोक गिरी
पवनी:- भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका,समाजसेविका, कवयित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अषित प्राथमिक शाळा पवनी येथे शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.बिसने यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी देखील अभिवादन केले.शाळेतील उपक्रमशील शिक्षक ए.आर.गिरी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनकार्याचा परिचय व त्यांनी देशासाठी दिलेले योगदान याविषयी सविस्तर माहिती उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दिली.त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या जिवनकार्यावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत केले.स्पर्धेतील विजेता विद्यार्थी सौम्य बिसने इयत्ता तिसरी याचे शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.बिसने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी.डी.भोयर,एम.एम.जिवतोडे, सुप्रिया रामटेके, धनश्री मुंडले व शालेय विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.