जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डोंबिवली येथील चिदानंद ब्लड बॅकतील महिला कर्मचा-यांचा जनजागृती सेवा समितीच्या वतीने सत्कार

 

लोकदर्शन डोंबिवली👉(गुरुनाथ तिरपणकर

महिला वर्षाचे ३६५दिवस कार्यरतच असतात,संसारात महिलांचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.तशा महिला या सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत.त्या अनुषंगाने८मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नुकताच क.डों.म.पा.चे डोंबिवली,शास्त्रीनगर येथील हाॅस्पिटल मधील चिदानंद ब्लड बॅक येथील महिला कर्मचा-यांचा जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्यावतीने आकर्षक”सन्मानपत्र”प्रदान प्रदान करुन गौरविण्यात आले.यावेळी स्वरांगी शिगवण,रुपाली अहिरे,सदफ खान,किरण देवरुखकर,कल्याणी दहीवल,नम्रा मिर्झा,अर्चना साबळे,सुचित्रा दुर्गुडे,प्रियांका गावकर,संजली साळी,मृणाल जाधव,रेणुका हंकारे,अपर्णा घरत,रत्ना सोनावणे,मिनाक्षी गायकवाड,शिल्पा पवार,त्रिवेणी खंडागळे,वैधवी ओरसकर,गाथा गजभिये,यांना जनजागृती सेवा समितीच्या पदाधिका-यांच्या हस्ते”सन्मानपत्र”देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला जनजागृतीच्या पदाधिकारी सौ.मिनल गावडे तसेच जनजागृतीच्या ग्रुप सदस्या स्वप्नाली पांचाळ,सविता ठाकुर,सुनिता मिश्रा या उपस्थित होत्या.तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर व सहखजिनदार सौ.श्रुती सतिश उरणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *