लोकदर्शन 👉 राहुल खरात
सिन्नर – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशंनच्या वतीने 38 वा. सत्यशोधक विवाह सत्यशोधक सचिन गोविंद माळी(कानडे), मुसळगाव आणि सत्यशोधिका अक्षदा बाबुलाल माळी (जाधव), कुंदेवाडी यांचा सत्यशोधक स्थापना दीन शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि ज्ञानज्योती सावत्रीबाई फुले शताब्दी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दि.9 मार्च 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता उगले लॉनस ,सिन्नर येथे आयोजित केलेला आहे.
विशेष म्हणजे या कुटुंबात 19 जुलै 2020 रोजी याच संस्थेच्या वतीने मुलीचा सत्यशोधक विवाह लावला तर तिच्या दिराचा 19 जुलै 2021 रोजी लावला होता.
या कुटुंबाने खऱ्या अर्थाने समाजाला स्वतः महात्मा फुले यांचे कृतिशील विचार अंगीकृत करून त्यांनी घराची पूजा देखील सत्यशोधक पद्धतीने करून सर्व कार्य सत्यशोधक पद्धतीने करण्याचा व इतरांना प्रबोधन करून नुकतेच सत्यशोधक गोविंद माळी यांनी फुले एज्युकेशनचे वतीने 26 जाने 23 रोजी नाशिक येथे सत्यशोधक पद्धतीने साखरपुडा कार्यक्रम पार पाडला असून ते कृतिशील कार्यकर्ते देखील बनले चे विधिकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी सांगितले आहे.
या विवाहप्रसंगी कोणत्याही स्वरूपात आहेर न स्वीकारता अनाथ मुलांसाठी देणगी स्वीकारून आणि विवाह प्रित्यर्थ अक्षता म्हणून तांदूळ न वापरता देणगी स्वरुपात मदत करणार असल्याचे गोविंद माळी यांनी सांगितले. सर्व समाजाला या निमित्ताने दिशा दिल्याचा व आर्थिक उधळपट्टी न केल्याने मनस्वी आनंद होईल असे त्यांनी मत व्यक्त केले आहे.
यावेळी वधू वर यांना रजिस्टर नोंदणी करून मान्यवरांचे व अध्यक्ष रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र दिले जाणार आहे.तसेच या प्रसंगी महात्मा फुले रचित मंगलाष्टके राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विस्वस्त प्रा.सुदाम धाडगे गायन करणार असून अंधश्रध्दा कर्मकांड याला तिलांजली दिली म्हणून आई वडील आणि मामा मामी यांचा यावेळी सन्मानपत्र देऊन संस्थेचे वतीने सत्कार केला जाणार आहे.