लोकदर्शन मुंबई – -👉गुरुनाथ तिरपणकर
प्रेमाला सागराची उपमा दिली जाते. प्रत्येकाच्या मनातील प्रेम सागरात भावनांच्या अमर्याद लाटा उसळत असतात. त्या लाटांना , त्या भावनांना किनाऱ्याची अपेक्षा असते. तो किनारा तुम्हाला सापडला आहे का?
आता तो किनारा शोधायला तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही कारण ‘ग्लोरीअस रिफ्लेक्शन प्रोडक्शन आणि रुप्स रेकॉर्ड म्युझिक’ घेऊन आले आहेत प्रत्येकाला आपल्या प्रेमाची आठवण करून देणारं गाणं ‘चंचल किनारा’.
दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ रोजी ” चंचल किनारा” हे भावविभोर करणारे अतिशय सुंदर गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले अन् अवघ्या दोन दिवसातच चाहत्यांची पसंती मिळवत युट्यूबवर तब्बल २७ हजार व्यूव्ज चा टप्पा पार केला आहे. रसिक श्रोत्यांनी या नाविन्यपूर्ण गाण्याला भरघोस प्रतिसाद दिला आहे व दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालली आहे.
गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे “चंचल किनारा” प्रत्येक पिढीतील व्यक्तीच्या काळजाचा ठाव घेतेय. अप्रतिम शब्द, कर्णमधुर स्वर, काळजाला भिडणारे संगीत अशा सर्वच बाबतीत किनाराने बाजी मारली आहे व कौतुकास पात्र ठरले आहे.
“आजच्या आधुनिकतेच्या काळात आपला खरा संवाद हरवलेला आपल्या सर्वांना जाणवत आहे . ‘चंचल किनारा’ या गाण्यामधला आत्मा तोच खरा संवाद आहे, जो तुम्ही ओळखून गाण्याला पसंती दर्शवली. अशा दर्दी चाहत्यांचा वर्ग याच आधुनिकतेच्या काळात काही अंशी हरवत चालला आहे, त्याला बांधण्याच काम येणाऱ्या काळात
‘रुप्स रेकॉर्ड म्युझिक’ नक्की करेल, पण त्यासोबतच आम्हाला गरज आणि साथ हवी आहे तुमच्या सारख्या श्रोत्यांची , जी तुम्ही आम्हाला नक्की द्याल अशी खात्री आहे.
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच प्रेम आमच्या वर करत राहा, लवकरच अशा आशयाची नवनवीन गाणी चाहत्यांच्या भेटीला घेऊन येत आहोत. त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला
सबस्क्राईब करायला विसरू नका.”
असे मनोगत निर्माते तसेच रूपस् रेकाॅर्ड म्युझिकचे संगीतकार रूपेश पारगावकर यांनी व्यक्त केले आहे.
लवकरच हे गाणं निरनिराळ्या संगीत वाहिनीवर (म्युझिक चॅनल) प्रसारित होणार आहे. तुम्ही अजूनही ऐकले, पाहिले नसेल तर पुढे दिलेल्या लिंकवर जाऊन या सुरेख गाण्याचा आस्वाद घेऊ शकता. महत्त्वाचे म्हणजे या बहारदार गाण्यामुळे मुंबई येथील सुप्रसिध्द कवयित्री/लेखिका कस्तुरी देवरुखकर यांचा गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला आहे.
* निर्मिती : तेजस्वी महांगरे
ग्लोरीअस रिफ्लेक्शन प्रोडक्शन
रूपेश पारगावकर – रूपस् रेकाॅर्ड म्युझिक
गायिका : मुग्धा इनामदार
संगीत दिग्दर्शक : रूपेश पारगावकर – रूपस् रेकाॅर्ड म्युझिक
गीतकार: कस्तुरी देवरुखकर
अभिनेत्री : तृप्ती राणे (बनी)