,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन👉 प्रतिनिधी
,,,,,,,,,,,,,,,,,,
*गडचांदुर शहर एक मोठी बाजारपेठ असल्याने येथे शाळा कॉलेजेस व शिक्षणाची उत्तम सोय उपलब्ध असल्याने येथे खेड्यापाड्यातुन लोकं आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी येतात तसेच मोठया संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात, त्यामुळे बस स्टैंड परीसरात मोठ्या प्रमाणात दररोज गर्दी जमलेली असते, अल्पवयीन मुले अती वेगाने सैरावैरा बाईक चालवित असल्याने अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरीकांनाच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे,या अपघावर अंकुश लावण्याकरिता बस स्टँड परीसरात वाहतूक पोलीस शिपाइ नियुक्त करून बंदोबस्त करावा व बेधुंद सैरावैरा बाईक चालविणा–या अल्पवयीन मुलांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळण्यात याव्यात अशी मागणी नव्यानेच रूजू झालेले ठानेदार रविंद्र शिंदे यांच्याकडे शेतकरी संघटनेचे सरचिटणीस संतोष पटकोटवार, संजय मडावी, विकास कागने, सिकंदर बनसोड, वासुदेव गौरकार ,दिलीप आस्वले शैलेश विरूटकर,मनोहर सातपुते सौरभ बनसोड, सागर पटकोटवार यांनी निवेदनातुन केली आहे,*
,,