लोकदर्शन 👉प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
राष्ट्रीय विज्ञान दिन चे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,माथा येथे 28 फेब्रुवारी ला विज्ञान महोत्सव सोहळा घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक विजय बांदूरकर होते ,त्यांनी विज्ञानाची गरज व उपयोगिता यावर विविध उदाहरणं देऊन मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन साधनव्यक्ती
सीमा काटकर होत्या, त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून *संशोधक व शास्त्रज्ञ यांच्या जीवनकार्याविषयी* माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
विशेष अतिथी म्हणून महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथील विज्ञान शिक्षक प्रशांत धाबेकर होते
त्यांनी आपल्या मनोगतातून *आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनाविषयी चिकित्सकपणे विचार करून वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी बाळगावा* असे नमूद केले.आणि डॉ.सी.वी.रमण यांच्या जीवनकार्याचा उल्लेख करून *रमण इफेक्ट* समजाऊन सांगितला..
गुरूदास कुबडे
(सहा.शिक्षक शाळा माथा)
यांनी *प्रतिकृती व प्रयोगाची मांडणी कशी करायची* हे समजावून सांगितले.
तृप्ती करमनकर
(सहा.शिक्षक शाळा माथा)
यांनी *सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रतिकृती व प्रयोग कसे तयार करायचे* याविषयीं खूप मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
सुभाष पाचभाई
(विज्ञान विषय शिक्षक शाळा माथा)
यांनी आपल्या मनोगतातून *विज्ञान व दैनंदिन जीवन* यांची सांगड घालून *विज्ञानाचे मानवी जीवनात असलेले विविध महत्त्व* स्पष्ट केले.
वर्ग 1 ते 7 च्या विद्यार्थ्यांनी स्वकल्पनेने एकूण 38 विज्ञान प्रयोग व प्रतिकृती तयार केल्या
प्रयोगाचे सादरीकरण करत असताना विद्यार्थ्यांनी सदर प्रयोगाची दैनंदिन जीवनात होणारे उपयोग प्रभावीपणे स्पष्ट केले
विद्यार्थ्यांनी मांडणी केलेल्या प्रतिकृती व प्रयोगाचे मूल्यमापन( परीक्षण) करून प्राथमिक स्तर तीन व उच्च प्राथमिक स्तर तीन प्रात्यक्षिक प्रतिकृती व प्रयोगाची निवड करून विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला,कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता शाळेतील शिक्षक सुभाष पाचभाई ,सना शेख,.तृप्ती करमनकर ,.गुरुदास कुबडे यांनी विशेष सहकार्य केले* हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान विषयाबद्दल विशेष गोडी व आवड निर्माण करणारा झाला हे विशेष