लोकदर्शन 👉 शुभम पेडामकर
मुंबई: मुंबईतील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या कॉलेजच्या आंतरमहाविद्यालयीन फेस्टिव्हलमध्ये आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी विविध महाविद्यालये आणि संस्थांमधील अनेक विद्यार्थी वर्ग सायन येथील गुरू नानक महाविद्यालयाच्या झील महोत्सवात दिनांक 27 व 28 जानेवारी रोजी सहभागी झाला होता. कोविड 19 मुळे गेली दोन वर्ष महाविद्यालयात कोणत्याही प्रकारचे महोत्सव भव्यदिव्यरित्या साजरे झाले नव्हते परंतु यावर्षी गुरू नानक महाविद्यालयात झील महोत्सव साजरा झाल्यामुळे मोठ्या उत्साहात 48 महाविद्यालयातील 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, फ्री स्टाईल आणि स्ट्रीट डान्स आणि इतर अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.
एकूण 3000 हून अधिक विद्यार्थी या महोत्सवात सक्रियरित्या सहभागी झाले होते.
यंदाच्या झील महोत्सवाची थीम :ZEAL-ZECO WORLD’ म्हणजे कल्पनाशक्ती आणि अतिवास्तव जगाशी संबंधित अशी ठेवण्यात आली होती.त्याचबरोबर या महोत्सवाचे खास आकर्षण होते ते म्हणजे सेलिब्रिटी पाहुणे – काम भारी, पियुष शर्मा, गुरलीन कौर, हिटझोन, रजनीश पटेल, ध्रुवन मूर्ती,प्रिया टिपाले आणि अनुज ठाकरे.
“विद्यार्थ्यांसह झील महोत्सवात काम करणे आणि विद्यार्थ्यांना एकत्रित आणणे ही एक आनंदाची बाब आहे. व्यवस्थापन आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांना नेहमी पाठिंबा देतात आणि झील महोत्सवाच्या माध्यमातून वर्षानुवर्षे त्यांची सर्जनशीलता समोर आणण्यासाठी त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतात.” असे प्रतिपादन झील महोत्सवाच्य समन्वयिका प्रा.हरप्रीत कौर यांनी केले .
“विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे आणि परिश्रमांचे यश पाहून आम्हाला खूपच आनंद होत आहे . कारण यंदाचा महोत्सव हा भव्य होता त्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या अप्रतिम कार्याचा आम्हाला अभिमान आहे.” असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पिंदर भाटिया यांनी प्रतिपादन केले .
शुभम पेडामकर