लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
” सबका साथ सबका विकास ” या मुल मंत्रावर चालणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि होत असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेऊन आज वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री विकासपुरुष लोकनेते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांच्या मार्गदर्शनात आज कोरपना तालुक्यातील गाडेगाव (विरूर) येथील असंख्य कार्यकर्त्यानी भाजपा युवा नेते निलेशभाऊ ताजने यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, गणेश आस्कर,शक्तिकेंद्र प्रमुख गाडेगाव ,सरपंच तेजस्विनी मनोहर झाडे, उपसरपंच मारोती गोखरे, धनराज राजूरकर, बालाजी राजूरकर, सुभाष राजूरकर, विष्णु हेपट, महादेव वैरागडे, श्रीकृष्ण डवरे, आकाश गोरे, अविनाश झाडे, समीर कुंभे, गणराज राजूरकर, संदीप काकडे, मोरेश्वर पाचभाई, देवाजी आत्राम, दीपक बांदूरकर, सुरज पाचभाई, सूर्यभान लोहे, संजय बोभाटे, सुरज लोहे, ज्ञानेश्वर पिंपळकर, उत्तम कांबळे, विशाल कोंगरे, ओंकार वैरागडे, अविनाश तामखाने, साईनाथ पाचभाई, प्रवीन कुरेकर, सिदार्थ गावंडे, आशा ताजने, मालाबाई चौकांद्रे, मीनाबाई सुर्पम, रुंदा अतकर यांच्यासह आदींनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.
याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा महामंत्री नामदेवजी डाहुले, गजपुरेजी, आशिष देवतळे जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा चंद्रपूर, माजी आमदार सुदर्शनजी निमकर, कोरपना तालुकाध्यक्ष नारायणजी हिवरकर, गडचांदूर शहर अध्यक्ष सतीश भाऊ उपलेंचवार,अरुणभाऊ मडावी, अमोल आसेकर आदीसह उपस्थित होते.