by : Shankar Tadas
* ११-१२ मार्च रोजी वन अकादमी, चंद्रपूर येथे आयोजन
चंद्रपूर: चंद्रपुर शहरात आयोजित ३५वे पक्षीमित्र संमेलनाच्या लोगोचे अनावरण इको-प्रो कार्यालयात आयोजित बैठकीत करण्यात आले.
यंदा इको-प्रो संस्थे तर्फे 11 व 12 मार्च 2023 रोजी चंद्रपुर शहरात ३५ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन वन प्रबोधिनीच्या प्रशस्त परिसरामधे आयोजित करण्यात आले आहे. नियोजनबाबत बैठक आयोजित करण्यात आलेली होती या दरम्यान संमेलनाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
चंद्रपूर या गोंड़कालीन ऐतिहासिक शहरात आयोजित होत असल्याने शहराची ओळख म्हणून लोगोमधे किल्ला-परकोटाची भींत घेण्यात आलेली असून जिल्ह्यातील माळढोक पक्षी व त्याच्या अधिवास संवर्धनाची गरज आणि जिल्ह्यातुन संपुष्टात आलेला ‘सारस’ पक्षी, अधिवासबाबत चिंतन करण्याच्या दृष्टीने, हा लोगो (बोधचिन्ह) लक्ष वेधून घेणारा आहे.
यावेळी भाविक येरगुडे, सार्ड संस्था, विलास माथनकर, संजय जावडे, नितीन डोंगरे, महेद्र राळे, पुथ्वीमित्र पर्यावरण संस्था, आशीष घूमे, जंगल जर्नी च्या चित्रा इंगोले, स्वब नागभीड़ चे यश कायरकर, इको-प्रो चे बंडू धोतरे, बंडू दुधे, नितिन रामटेके, ललित मुल्लेवार, भद्रावती संदीप जीवने, सुमित कोहले, जयेश बैनलवार, बंडू दूधे, अभय अमृतकर, रोशन धोतरे, स्वप्निल मेश्राम, भूषण प्रामुख्याने उपस्थित होते. संमेलनाच्या आयोजनबाबत विवीध विषयावर यावेळी चर्चा करण्यात आलेली आहे. संमेलनदरम्यान खालील विषयावर त्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांची व्याख्याने परिसंवाद व सादरीकरणे आयोजीत केली जाणार आहे. ‘माळढोक’ पक्ष्यांची जिल्हा व राज्यातील परिस्थिती, “सारस’ पक्षी संवर्धनापुढील आव्हाने, चंद्रपूर जिल्ह्यात ‘सारस’ पक्षाचे पुनरागमन कसे होईल, संकटग्रस्त ‘सारस व माळढोक’ या पक्षी संवर्धनासाठी देश पातळीवरील प्रयत्न व भविष्यातील वाटचाल, पक्षी अधिवास संवर्धन, पक्षी संवर्धन, राज्यातील नविन रामसर स्थळांची निर्मिती व रामसर स्थळांची सध्यस्थिती, पक्षी संशोधन, अभ्यास व संवर्धन संबंधित विषय व आवाहने आदि विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे.
या संमेलनात राज्यातील तिनशे पेक्षा अधिक पक्षीमित्र, अभ्यासक, विविध संस्थेचे प्रतिनीधी उपस्थीत राहणे अपेक्षीत असुन या दोन दिवस चालणाऱ्या संमेलनात पक्षी अभ्यासकांचे मार्गदर्शन व सादरीकरण सुध्दा होतील तसेच नवोदितांचे सादरीकरणस सुध्दा संधी राहणार आहे. निवास व्यवस्था, छायाचित्र प्रदर्शन, छायाचित्र स्पर्धा, स्मरणीका प्रकाशन, शालेय विद्यार्थ्याना सहभागी करून घेण्यासाठी काही स्पर्धा ई. कार्यक्रम या दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहीती इको-प्रो संस्थेचे पर्यावरण विभाग प्रमुख नितिन रामटेके, इको-प्रो पक्षि संरक्षण विभाग चे बंडु दुधे, यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.