लोकदर्शन मुंबई 👉-महेश्वर तेटांबे)
अनमोल चित्र प्रोडक्शन निर्मित
सुनिता ओशिवळेकर व मधुरा अनमोलराजे निर्मिती असलेला मराठी लघुपट कडू साखर हा एक अर्ध सत्य घटनेवर आधारित वास्तववादी लघुपट आहे. आर्थिक संकटांवर मात करून या लघुपटाची निर्मिती केली असून बाप आणि एकुलती एक मुलगी हि पात्रे केंद्र स्थानी ठेवली आहेत. बबन जोशी यांनी या लघुपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले असून दिग्दर्शक आणि मध्यवर्ती भुमिका त्यांनीच साकारली आहे. सोबत सुनील जाधव, जॉनी कदम, सुधाकर वसईकर, आबा पेडणेकर, रश्मी लुकतुके, वंदना गानू, अर्चना डोळस, ऐश्वर्या मोहिते, नरेश कांबळे, अमोल पाटील, अश्विनी पगारे, लता गणता, सुनिता ओशिवळेकर, त्रिशा पवार, अभिजित कोंडकर, श्रीकृष्ण कदम, संदीप जाधव, रोहन पडवणकर, प्रदीप म्हात्रे, पुंडलिक वाडेकर यांनी देखील अभिनय सिद्धता दाखवली आहे. या लघुपटाच्या ध्वनिमुद्रण आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी अमित स्वामी यांनी सांभाळली असून संकलन हे कार्तिक दमानी यांच्या स्टुडिओ मध्ये संपन्न करण्यात आले. लघुपटाच्या छायाचित्रणाची जमेची बाजू
वृषकेत वाडेकर यांनी साकारली असून लघुपटाचे सीसी, सबटायटल धीरज टकले यांनी केले आहे. त्याचप्रमाणे कला दिग्दर्शन अन्नू जोशी, कार्यकारी निर्माता अनमोल राजे तसेच अभिनेता मकरंद पाध्ये व मयुर कांबळे, बंदीश अवेरे आदी सर्व कलावंत आणि तंत्रज्ञ यांनी या लघुपटासाठी विशेष परिश्रम घेतले आहॆ. तसेच संध्या पाटणकर, सविता सोलंकी, सुधाकर वसईकर, बाळाराम जाधव, दिनेश जाधव, अविनाश अनसुरकर, किशोर राठोड यांनी देखील आर्थिक सहकार्य करून लघुपट पूर्णत्वाला नेला आहे.
नुकताच या लघुपटा करीता बबन जोशी यांना उत्कृष्ट दिग्दर्शक तर औरंगाबादमध्ये या लघुपटाला उत्कृष्ट लघुपट पुरस्कार जाहीर झाला असून लवकरच हा लघुपट अनमोल चित्र प्रोडक्शन या युट्युब वर रिलीज होणार आहे.