लोकदर्शन 👉 प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर, तहसील कार्यालय चंद्रपूर, व टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वनहक्क दावा प्राप्त गाव महादवाडी येथे जात प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम 24 फेब्रुवारी ला आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून म्हणून श्री रोहन घुगे ( मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा.)होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय मुरुगनतम एम (प्रकल्प अधिकारी चंद्रपूर )होते,त्यांच्या हस्ते एकूण ७६ जातीचे प्रमाणपत्र ग्रामस्थांना वाटप करण्यात आले.
“आज केलेल्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने फुल श्रुती झाली “असे असे रोहन घुगे म्हणाले. यापुढे सुद्धा विविध योजनांची अंमलबजावणी करण्या करता शासन तत्पर राहील असे प्रकल्प अधिकारी म्हणाले
कार्यक्रमाला श्री जितेंद्र गद्देवार नायब तहसीलदार श्री आवारी मंडळ अधिकारी श्रीमती प्रीतम थेरमे तलाठी महादवाडी महाडोळे ग्रामसेवक महादवाडी श्री कुळमुथे प्रकल्प कार्यालय चंद्रपूर कुमारी स्नेहा ददगाळ जिल्हा व्यवस्थापक चंद्रपूर कुमारी वैष्णवी चौधरकर तालुका व्यवस्थापक चंद्रपूर तसेच नितीन ठाकरे अमोल कुकडे, प्रवेश सुटे, जगदीश डोळसकर टाटा सामाजिक संस्था मुंबई उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन निखिल गेडाम व महादवाडी ग्रामस्थांनी केले.
,