लोकदर्शन पवनी 👉 अशोक गिरी
पवनी:- लोकांना स्वच्छता व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मुलमंत्र आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून देणारे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची १४७वी.जयंती अषित प्राथमिक शाळा पवनी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.बिसने यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी उपस्थित सर्वांनी प्रतिमेचे पुजन अभिवादन केले. यावेळी शाळेतील उपक्रमशील शिक्षक ए.आर.गिरी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गाडगेबाबा यांचा जिवनपरिचय व त्यांनी केलेले लोकशिक्षण, लोकजागृती, समाजसुधारणा, लोकांसाठी काढलेल्या धर्मशाळा तसेच कीर्तनाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन वसमाजप्रबोधन कसे घडविले याविषयी सविस्तर माहिती दिली.विद्यार्थांना दिलेल्या माहितीचे आकलन झाले किंवा नाही याची प्रचिती घेण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.यावेळी नानाविध प्रश्न विचारुन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडली.शेवटी इयत्ता तिसरीचा विद्यार्थी गणेश गोटाफोडे याने सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याने त्याला विजेता घोषित करून शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.बिसने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचलन ए.आर.गिरी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पी.डी.भोयर,एम.एम.जिवतोडे, सुप्रिया रामटेके तथा शालेय विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.