फुले एज्युकेशन तर्फे सत्यशोधक पद्धतीने “सुरेखशिल्प” चा 5 वा.वास्तू पूजन सोहळा संपन्न.
लोकदर्शन 👉 राहुल खरात
अंबेजोगई – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन तर्फे जिजाऊनगर, अंबेजोगाई येथे जिल्हा प्रा.शाळा, बोरीसारेगाव, केज च्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा वसंतराव लगडे (गोरे) यांच्या अथक प्रयत्नातून साकार झालेल्या “सुरेखशिल्प” बंगल्याची वास्तू पुजन व गृहप्रवेशाचा सोहळा महात्मा फुले यांच्या सत्यशोधक पदधतीप्रमाणे युगपुरुष बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती निमित्त संपन्न झाला. हा सोहळा फुले एज्युकेशन तर्फे 5 वा.असून पहिला सत्यशोधक गृहप्रवेश वास्तू पूजन सोहळा लातूर येथे त्यांची सुकन्या सत्यशोधिका वर्षा माळी यांची देखील विधिकर्ते म्हणून सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी कार्य पाडले होते.
यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक,अध्यक्ष यांचे शुभहस्ते हेमंतकुमार व आई सुरेखा लगडे यांना फुले दाम्पत्य फोटो फ्रेम आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.सोबत मामा मामी आणि वर्षा माळी यांना देखील सन्मानपत्र देण्यात आले.
यावेळी डॉ.जयश्री आणि डॉ.रवींद्र माळी,बार्शी यांनी शुभेच्या देताना म्हंटले की फुले दाम्पत्यानी 150 वर्षा पूर्वी जे विचार पेरले,कृतिशील कार्य केले त्याचे अनुकरण लगडे परिवाराने अंधश्रद्धा , कर्मकांड याला मूठमाती देत शिवजयंती दिनी सत्यशोधक पद्धतीने पूजा करून महापूर्षांचे कार्य अंगीकारले त्याबद्दल अभिंनदन केले.
यावेळी वर्षा माळी म्हणाले की शिवाजी महाराज यांची जयंती महात्मा फुले यांनी रायगडावर समाधी शोधून 1869 साली सुरू केली सोबत त्यांनी भारतात प्रथम शिवाजी महाराजांवर मोठा पोवाडा तयार केला. त्याकाळात ते 10 दिवस शिवजनमोत्सव साजरा करीत होते.आज देखील सर्व सुविधा असतानाही म्हणावा असा शिवजयंती महोत्सव साजरा होत नसल्याची खंत व्यक्त करीत महापूर्षांचे विचाराने एक तरी कृती अंगिकारावी असे म्हंटले. पुढे वर्षा म्हणाले की आज च्या शुभदिनी माझ्या आईच्या बंगल्याची पूजा करण्यासाठी या आधुनिक काळातील कृतिशील कार्य महाराष्ट्र व महाराष्ट्राचे बाहेर पुढे घेऊन जाणारे आधुनिक महात्मा फुले यांच्या वेशभूषेत सत्यशोधक ढोक सर यांनी पुण्यावरून येऊन हे विधी कार्य मोफत पार पाडले हा योगायोग आज घडला हे आमच्या परिवाराचे भाग्य असून फुले यांचा वारसा पुढे घेऊन जात असल्याचा आनंद होत आहे असे देखील म्हंटले.सोबत वर्षा ताईंनी माँ जिजाऊ, शिवराय, क्रांतीसुर्य , आधुनिक सावित्री यावर स्वलिखित कविताचे गायन करून प्रबोधन केले.
या प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांना द्यानजोती ग्रंथ व पुष्पगुच्छ शाल देऊन सन्मानित केले.यावेळी या सत्यशोधक पूजेचे अनुकरण केले पाहिजे अशी सगळे जण चर्चा करीत होते यामुळे समाज बदलेल अशी आशा व्यक्त करीत होते.
यावेळी हेमंतकुमार लगडे यांनी आभार मानले.तर ऋषिकेश यादव यांनी मोलाची मदत केली.