बल्लारपूरचे पवन भगत यांना “ऑथर ऑफ दि इयर” पुरस्कार

by : AshokKumar Bhagat

गडचांदूर, जि. चंद्रपूर,

नुकतेच कलकत्ता लिटरेचर कर्णीवल, कलकत्ता येथे यंदाचा “ऑथर ऑफ दि इयर” हा बहू प्रतिष्ठित पुरस्कार एका मराठी लेखकाला मिळाला. या लेखकाने मराठी मानाचा तुरा रोवल्याने साहित्य वर्तुळात मोठे कुतूहल निर्माण झाले आहे.

इंडियन पब्लिशर्स फेडरेशन च्या वतीने दर वर्षी कलकत्ता येथे पुरस्कार देण्यात येतो..बहुभाषिक कथा, कादंबरी या स्पर्धेत सहभागी होत असतात. आशियातील विविध बुक पब्लिशर्स ची येथे रेलचेल असते. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर चे पवन भगत यांच्या लॉकडाऊन च्या काळातील स्थानांतरित,विस्थापित मजुरांच्या दाहकतेची गोष्ट सांगणारी कादंबरी ” ते पन्नास दिवस.. ” नुकतीच प्रकाशित झाली. पाहता पाहता या कादंबरी ची चर्चा सर्वदूर पोहचली.अनेक समीक्षकांनी,या कादंबरी वर भरभरून लिहिले. अमेझॉन वर वाचकांनी या कादंबरी ला चांगला प्रतिसाद दिला.अनेक भाषेत या कादंबरी चे अनुवाद सुरू झाले. लेखक पवन भगत यांनी ही कादंबरी जनतेची असल्याने त्यावर आपला हक्क नाही असे सांगून कुठलेही मानधन ने घेता सर्वांनाच मुक्त अधिकार बहाल केले.

या कादंबरी चा कुठलाही भाग कुणीही सरळपणे प्रकाशित करू शकतो. असे सांगून त्यावरील आपला हक्क नसल्याचे स्पष्ट केले. दुःखावर यातनावर मी कसा हक्क सांगू ? तमाम शोषितांची बाजू ठेवणार्यांनी मुक्तपणे याचा वापर करावा. दुःखाचे, उपवासाचे, आजारपणाचे, बहिष्कृताचे कॉपीराईट कसे होऊ शकते, हे तर शोषितांचे हत्यार आहे. असल्या विधानामुळे साहित्य विश्वात आश्चर्याची चर्चा सुरू होऊन एक नवीन पायंडा पवन भगत यांनी निर्माण केल्याचे बोलल्या जात आहे..

पुरस्कार मिळाल्या नंतर प्रेस ट्रस्ट शी बोलताना पवन भगत यांनी मी खुश कसा राहू शकतो? पुरस्काराचा कसला आनंद! जोपर्यंत जगात दुःख आहे. तोपर्यंत कुठल्याही विचारवंताने खुश राहू नये. अस्वस्थ असायला पाहिजे. विचारवंत, कलावंत, कवी,पत्रकार ,साहित्यिक अस्वस्थ असेल, तेव्हाच नवनिर्माण होईल. नवं साहित्य अस्तित्वात येईल. सदर पुरस्कार हा टाळेबंदीच्या काळात उपाशीपोटी रेल्वे च्या रुळावर मृत्यूमुखी पडलेल्या, हायवेवर जीव सोडलेल्या ज्ञात अज्ञात पायदळ चालणाऱ्या मजूरांना समर्पित केले आहे.

#pawanbhagat

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *