लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य धर्मराज काळे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. प्रशांत खैरे प्रा. मेहरकुरे, पर्यवेक्षक संजय गाडगे, सेवा जेष्ठ शिक्षिका ज्योती चटप उपस्थित होते. उपस्थितांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन करताना शिवरायाचा खरा इतिहास बहुजन समाजा पर्यंत पोहोचला नाही, तो समजून घेऊन वाचून सर्वांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शिक्षक वृंदांनी घ्यावी व शिवाजी महाराजांची जयंती घराघरात सणा प्रमाणे साजरी व्हावी असे विचार व्यक्त केले. शिवाजी महाराजांनी सर्व मावळ्यांना एकत्र करून जे स्वराज्य निर्माण केले ते टिकवण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी व सर्वधर्मसमभावाची शिकवण समाजात रुजविण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्टा करावी. हेच खरे शिवाजी महाराजांना व त्यांच्या विचारांना अभिवादन ठरेल असे मनोगत मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा आभार प्रदर्शन सेवा जेष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे यांनी केले या कार्यक्रमादरम्यान *गर्जा महाराष्ट्र माझा* हे महाराष्ट्र गीत भावपूर्ण आवाजात कु. उंमरे मॅडम श्रीमती शेंडे मॅडम , गोपमवार मॅडम कु. ताकसांडे मॅडम यांनी गायले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. झाडे , प्रा. जहीर प्रा. सातारकर, प्रा.गुजर, प्रा.मेहरकुरे,प्रा. मुप्पीडवार, प्रा.पोडे, प्रा. कु.ताकसांडे मॅडम, श्री मांढरे सर,श्री बावनकर सर, श्री बोबडे सर ,श्री वासेकर सर, श्री पाटील सर, श्री आडे सर,मरसकोल्हे सर, कोंगरे सर, मेश्राम सर, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्री सिताराम पिंपळसंडे, श्री एस.एम.चन्ने, श्री प्रेमचंद आदोळे इत्यादी उपस्थित होते.