लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली,
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की, बी के हस्ते,एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे, प्रा नंदाताई भोयर होत्या,
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, प्रा आशीष देरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असलेली लोकशाही धोक्यात आली असल्याचे सांगून शिवाजी महाराजांचे विचार आजच्या युवा पिढीने आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले,
वामन टेकाम, व प्रा प्रदीप परसुटकर यांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला,
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन वामन टेकाम यांनी केले,
याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,