लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा -महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य व नेट सेट संघर्ष समितीचे प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. गोविंद काळे हे गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मागासवर्गीय पदभरती आढावा बैठकीसाठी आले असता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे गों. वि. यंग टीचर्स असोसिएशनचे सचिव डॉ. विवेक गोर्लावार(सिनेट सदस्य), उपाध्यक्ष डॉ. नंदाजी सातपुते(विद्यापरिषद सदस्य), डॉ. शशी गेडाम तसेच सहसचिव डॉ. प्रमोद बोधाने, व डॉ. अनिल चहांदे यांनी भेट घेऊन त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य ॲड.श्री चंद्रलाल मेश्राम आणि प्रा. डॉ. श्रीमती नीलिमा सराफ(लखांडे) यांचे देखील स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी नेट सेट संदर्भातील न्यायालयीन सद्यस्थिती बाबत, बिगर नेट सेट महाविद्यालयीन शिक्षकांना कॅशचे लाभ देण्याबाबत व मागासवर्गीय पदभरती बाबत व प्राध्यापकाच्या विविध प्रश्नाविषयी त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
माननीय डॉ. गोविंद काळे यांनी नेट सेट चा प्रश्न हा अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याबाबत सकारात्मक निर्णय येईल असा आशावाद व्यक्त केला. तसेच दिनांक 16/02/ 2023 ला उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांचे एम.फिल. अहर्ताधारक अध्यापकांना कॅसचे लाभ लागू करण्याबाबतचे पत्रातील अनेक तृट्या यावर चर्चा करण्यात आली व बिगर नेट सेट महाविद्यालयीन शिक्षकांना पेन्शनचा प्रश्न याबाबत देखील विस्तृत चर्चा करण्यात आली. प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी या सर्व विषयावर सकारात्मक भाष्य केले असून नेटच्या प्रश्न लवकरच मार्गी लागेल तसेच दिनांक 16 फरवरी 2023 ला उच्च व तंत्र शिक्षण विभागातील विभागाच्या पत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी बाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासित केले आहे.