by : Shankar Tadas
चंद्रपूर :
ज्यांना ईश्वरप्राप्ती झालेली आहे असे संत -महात्मे साधकांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवितात. त्यांचे जीवन आणि उपदेश यानुसार वाटचाल केल्यास नक्कीच शास्वत आनंदाची प्राप्ती होईल. मात्र आध्यात्मिक साधनेतून लौकिक सुखाची अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे प्रतिपादन रामकृष्ण मठ, नागपूरचे स्वामी ज्योतिस्वरूपानंदजी यांनी केले.
श्रीरामकृष्ण – विवेकानंद सेवाश्रम, वडगाव, चंद्रपूर यांच्या वतीने आध्यात्मिक शिबिराचे आयोजन 12 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. याप्रसंगी ‘भगवान श्रीरामकृष्ण आणि आध्यात्मिक जीवन ‘ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
‘श्रीरामकृष्ण भावधारा’ या विषयावर रामकृष्ण मठ, नागपूरचे स्वामी ज्ञानगम्यानंदजी यांनी मार्गदर्शन केले. आध्यात्मिक साधना करीत असताना श्रीरामकृष्ण वाचनामृत वाचन, जपध्यान आणि बाह्यपूजा यांचे महत्व त्यांनी विशद केले. शिबिराचे प्रास्ताविक आश्रमाचे अध्यक्ष डॉ. शंकर झोडे यांनी केले.
आचार्य पदवीप्राप्त प्राध्यापक डॉ. रवींद्र मुरमाडे, डॉ. उमाकांत देशमुख, डॉ. कविता हिंगाने यांचा सत्कार स्वामी ज्योतिस्वरूपानंदजी आणि स्वामी ज्ञानगम्यानंदजी यांच्या हस्ते करण्यात आला. शिबिरात 125 भाविकांनी सहभाग घेतला होता.
याप्रसंगी आश्रमाच्या वतीने काही भक्तांचाही सत्कार करण्यात आला. त्यात शामरावजी घिवे, काशिनाथजी मनगटे, चंद्रकांतजी तेलंग, श्रीमती हिंगाणे, देविदास पडगीलवार, लक्ष्मणजी सूर, API अमरदीप खाडे, श्रीमती सुनंदा येरगुडे, रमेशजी येरगुडे, श्रीमती बेबीताई कुचणकर, निरंजन गायन, श्री अरुण पाटील, श्री हरिश्चंद्र येरगुडे, सौ. दुबे, अर्चनाताई येरगुडे, श्रीमती उषाताई उरकुडे, चंदुजी बोबडे, सुरेशजी बोबडे, सौ. स्मिता तडस, विजयजी मालेकर, सौ. छाया येरगुडे, सौ. उषा येरगुडे आणि पुजारी तुषार यांचा समावेश होता. शिबिराचे संचालन शंकर तडस यांनी तर आभारप्रदर्शन सचिव विठ्ठलजी येनोरकर यांनी केले.
#ramkrishanamathnagpur