लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 11रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरले गावातील कवियत्री अश्विनी शशिकांत माळी यांनी लिहीलेल्या तब्बल 100 कविता संग्रहाचे पुस्तक प्रकाशन सोहळा गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी चिरले गावातील श्री राम मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. चिरले गावातील अश्विनी माळी यांनी आपल्या काव्यसमूहाचे सुंदर नामकरण आठवणीच्या हिंदोळ्यावर असे केले आहे. त्यांच्या या पुस्तकात विविध प्रकारच्या 100 कविता वाचताना वाचक भारावून जातो. या पुस्तकाचे प्रकाशन शशिकांत माळी यांनी केले असून प्रस्तावना ईतिहासचार्य रायगड भूषण कवी,कादंबरीकार काशिनाथ माढवी यांनी केली. पुस्तक प्रकाशन सोहोळ्यास विविध क्षेत्रातील विविध दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती दाखवून अवघ्या 20 व्या वयात अश्विनी यांनी केलेल्या सुंदर कवितांची प्रशंसा करत मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशा शब्दात अनेक मान्यवरांनी तिचे कौतुक केले. या सोहोळ्याचे उद्घाटक चिरले ग्रामपंचायत सरपंच सुधाकर पाटील, उपसरपंच राजेंद्र घरत, प्रमुख अतिथी लेखक काशिनाथ मढवी, संमेलनाध्यक्ष हरिभाऊ घरत, अध्यक्ष काव्यदरबार प्रकाश ठाकूर हे होते तसेच या सोहोळ्यास लाभलेले प्रमुख वक्ते महाराष्ट्र कवी अरुण म्हात्रे, काव्यदरबार सल्लागार राजेंद्र नाईक, अध्यापिका अंजली मढवी, रंजना मढवी, अशा अनेक दिग्गज व्यक्तींनी केले. या सोहोळ्यात सुंदर स्वागत गीत ए. शा. म्हात्रे यांनी गायले. त्याचप्रमाणे चिरले ग्रामपंचायत सदस्या अस्मिता पाटील, पंढरीनाथ घरत, भगवान म्हात्रे ईत्यादी शुभेच्छा देण्यास उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात अश्विनी माळी यांना शुभेच्छा देण्यास प्रफुल्ल माळी, समीक्षा माळी, शशिकांत माळी, संगीता माळी, विलास माळी, चांगुणा माळी, लीला पाटील, गीता माळी, पांडुरंग पाटील, मीनल माळी, बळीराम पाटील, शंकर पाटील, अपर्णा ठाकूर, हरीशचन्द्र माळी, जगदीश ठाकूर, चैतन्य पाटील, मदन पाटील, मोतीराम मढवी, प्रविण म्हात्रे, पांडुरंग माळी, संदीप नाईक, मनीषा पाटील, प्रणाली पाटील, जितेंद्र घरत, रमण घरत,विनोद माळी, धोंडू पाटील, रंजना मढवी, तुळशीराम माळी, गीता माळी, अंकुर माळी, पंकज माळी असा सर्व परिवार उपस्थित राहिला होता. या पुस्तक प्रकाशनाच्या सोहोळ्याचे सुंदर सूत्रसंचालन साहित्यिका, अध्यापिका मिनल माळी तसेच उत्कृष्ट सूत्रसंचालक जगदीश ठाकूर यांनी केले.