लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदुर:
महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज, गडचांदुर येथील उद्यानविद्याशास्त्राचे (हॉर्टीकल्चर) चे प्रा. अशोक डोईफोडे यांनी मनिष नगर, नागपूर स्थित श्रीपतभाऊ राठोड व जयश्रीताई राठोड यांनी सिमेंटच्या जंगलात थेट चौथ्या मजल्यावर बावनपेक्षा जास्त प्रकारचे भाजीपाला पिके, विविध प्रकारच्या वनौषधी, फुलझाडे, फळझाडे तेही जैविक पद्धतीने तयार करुन सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देवून समाधान व्यक्त केल्याचे प्रकर्षाने जाणवले. आज रासायनिक खत व औषधीच्या जोरावर निर्माण होणारे अन्नधान्य,फळे व भाजीपाल्यामुळे सर्वांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून मानवाचे सरासरी आयुष्यमान वेगाने घटत चालले असताना राठोड परिवाराने साकारलेला प्रयोग खरोखरच दिशादर्शी व प्रेरणादायी असल्याचे प्रत्ययाला आले. अवघ्या सातव्या व आठव्या वर्गात शिकणाऱ्या अंजली राठोड आणि दिपाली राठोड यांचे अनुभवसिद्ध सादरीकरण खरोखरच कृतिशिल,प्रभावी व परिणामकारक वाटले. ग्रामिण व शहरी भागांसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे मनोगत प्रा. अशोक डोईफोडे यांनी आवर्जून प्रतिपादन केले. राठोड दांपत्याची जैविक शेती विकास अभियानाचे कार्य खरोखरच समाजोपयी असल्याची खात्री परसबागेला भेट दिल्यावर सहजपणे हे मात्र विशेष.
या प्रसंगी वसंतराव परसबागेतील गुलाबफुलांच्या पुष्पगुच्छांनी प्रा. अशोक डोईफोडे यांचे राठोड परिवारांकडून स्वागत करण्यात आले.