by : Ajay Gayakwad
वाशिम / मालेगांव : संत नरहरी सोनार पुण्यतिथीनिमित्त शहरात भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या पालखी सोहळ्यामध्ये सजवलेल्या रथामध्ये संत नरहरी सोनार यांची प्रतिमा व फोटो ठेवन्यात आला होता. पालखीमध्ये लहान बालक वारकरी झेंडे धारक टाळ मृदुंगाच्या तालावर थिरकत होते. पालखीची सुरुवात शिव चौकातील मालनेश्वर मंदिर येथुन सुरवात करण्यात आली. सर्वप्रथम नरहरी महाराजांचे पूजन अध्यक्ष सौ अरुणाताई भांडेकर यांच्या हस्ते झाले. पालखी गाजत वाजत शिस्तबद्धरित्या रांगेत शिव चौक गांधी चौक सोनार गल्ली दुर्गा चौक बकुठे वेटाळ माळी वेटाळ पांडे वेटाळातून ही मिरवणूक पुन्हा शिव चौकातून श्री विठ्ठल मंदिरात नेऊन विसर्जन करण्यात आली. त्यानंतर श्री सत्यसाई भवन येथे सर्व समाज बांधवांनी पूजन आणि आरती केली त्यावेळी डॉ श्रीकांत भांडेकर आणिडॉ पूजा भांडेकर यांनी आरोग्य तपासणी केलीआणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किशोर पंडितकर हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ भांडेकर ,ज्ञानेश्वर वाढणकर ,कचरूलाल वर्मा रमेश वाढणकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कुमुद अष्टोनकर व गौरी भांडेकर यांनी केले आभार प्रवीण गौरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनार समाजातील सर्व तरुण मंडळींनी सहकार्य केले.महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता झाली..