हिंदू जनआक्रोश मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

by : Ajay Gayakwad

वाशिम / मालेगाव :  मालेगाव शहरात सकलहिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.  या मोर्चाला विविध हिंदू संघटना आणि हिंदू बंधू – भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील शिवचौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील प्रमुख मागवरून मोर्चा काढण्यात आला. ५ फेबृवारी रोजी सकाळी १० वाजता हिंदू जनआक्रोश मोर्चाला श्रीराममंदीर शिवचौक येथून सुरुवात करण्यात आली होती. गांधी चौक मार्गाने मेडीकल चौकातून जुने बसस्थानक मार्गे डॉ जोगदंड हॉस्पिटल ते दुर्गा चौक, जैन मंदीर समोरून,माळीवेटाळ येथून जिल्हा परिषद मराठी शाळे समोरिल या मार्गावरून मोर्चा काढण्यात आला मोर्चात हजारो सकल हिंदू बांधवासह भगीनींचा मोठ्या संख्येतील सहभाग लक्षणीय उपस्थिती होता शहरातील ज्या ज्या भागातून मोर्चा जात होता तेथे भगवामय वातावरण दिसत होते मोर्चा शिवचौक येथे पोहोचल्यावर येथे हजारो सकल हिंदू बांधवासह उपस्थित महिला भगिनींच्या मोर्चाचे रूपांतर येथे भव्य सभेत झाले शिवचौक येथील भव्य प्रांगणात हजारोच्या संख्येने उपस्थित सकल हिंदू समाज बंधू -भगिनीना येथे सोपान महाराज कनेरकर यांचे जाहीर व्याखानाने संबोधीत करण्यात आले याप्रसंगी व्याखाते सोपान महाराज यांनी हिंदूनी आपली संस्कृती जपली पाहीजे,आमुचा देश,आमुचा देव,आमुचा धर्म,आमुचे संत, आमुचे ग्रंथ हे टिकले पाहीजे असे सांगीतले ते म्हणाले भारतमातेसाठी आपल्या देशासाठी अनेक क्रांतीकारी व शूर विरांनी स्वतःच्या प्राणाचा विचार न करता आपल्या देशाचा आणि हिंदू धर्माचा विचार केला म्हणून हा हिंदूधर्म जिवंत आहे असे ते म्हणाले.
या सर्व बाबीचा विचार करून राज्य व केंद्र सरक कारने देशात लव्ह जिहाद,गोहत्या,धर्मांतरण बंदी कायदा लागू करून राज्यात गोहत्या बंदी कायदयाची प्रभावी अमलबजावणी करावी या मागणी साठी शहरातील सकलहिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला शहरातील व्यापारीमंडळी कडून दुपारपर्यंन्त आप-आपली प्रतिष्ठाणे बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून सकल हिंदू जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले होते.यावेळी तहसिलदार यांना सकल हिंदू समाजाकडून लेखी निवेदन देण्यात आले .राष्ट्रगीताने सकलहिंदू मोर्चातील व्याखानाचा समारोप करण्यात आला.

#malegaonwashim #ajaygayakwad

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *