by : Ajay Gayakwad
वाशिम
मालेगाव-विदर्भाची प्रती पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या व लाखों भाविकांचे भक्तीस्थान ,शक्ती स्थान व श्रद्धास्थान असलेल्या नाथ नगरी श्री क्षेत्र डव्हा येथे श्री नाथनंगे महाराज यांच्या भव्य यात्रा महोत्सवा निमित्त आयोजित महाप्रसादाचा लाखो भाविकांनी लाभ घेतला कोरोणा कालावधीत मागील दोन वर्षात भाविकांना रथसप्तमीच्या मुहूर्तावर नाथांच्या चरणी नतमस्तक होता आले नाही त्यामुळे यावर्षी दर्शनासह महाप्रसादासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावर्षी दोनशे किंटलच्या पुरी भाजी बुंदी महाप्रसादाचे वाटप संस्थानच्या वतीने करण्यात आले महाप्रसाद वाटपा साठी परिसरातील पन्नास टॅॅक्टर व २५००स्वयं सेवकांनी सेवा बजावली महाप्रसाद वाटपाचे मैदान दुपारी एक वाजता पासूनच गर्दीने फुलून गेले होते यात्रा महोत्सवा निमित्त संस्थानच्या वतीने श्री.नाथनंगे महाराज,परम पुज्य विश्वनाथ बाबा यांच्या सह सर्व मंदीराची रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती नाथांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांनी मंदीर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला दुपारी तिनं वाजता दरम्यान ढोल ताशांच्या गजरात सजावट केलेल्या नाथांच्या पालखी सह शेकडो ट्रॅक्टर मध्ये भरलेल्या महाप्रसादाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली दुपारी चार वाजता दरम्यान पालखी सह प्रसाद वाटपाच्या ठिकाणी पोहचला त्यांनंतर फटाक्यांच्या आतिषबाजी नंतर स्वंयसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांना प्रसादाचे वाटप केले हभप सिताराम महाराज खानझोडे यांच्या मधुर वाणीतून नाथांचा जयघोष झाल्या नंतर भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला प्रसाद वाटपाच्या वेळी रिसोड मालेगाव मतदार संघाचे आमदार अमीत झनक,माजी आमदार विजयराव जाधव, नाथनंगे महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेशराव घुगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव चोपडे,संस्थानचे विश्वस्त अजयराव राजुरकर,माजी प्राचार्य प्रकाश कापुरे,भाजपाचे माजी तालुकाअध्यक्ष तानाजी पाटील पवार, यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती.