लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक, तसेच महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने “वसंतोत्सव” 2023 हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम गडचांदूर या ठिकाणी 23 जानेवारी ते 26 जानेवारी 2023 या कालावधीत घेण्यात आला. याच कार्यक्रमातील एक भाग म्हणून दिनांक 25 जानेवारी 2023 रोज बुधवार ला या शाळेतील सण 1992 व 1993 या वर्षात इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या माजी विध्यार्थ्यांचा “माजी विध्यार्थी सत्कार मेळावा” घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.डॉक्टर श्री अनिलराव चिताडे (परीक्षा नियंत्रक गोंडवाना विधापीठ गडचिरोली तथा संचालक गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर ) हे होते तर स्वागताध्यक्ष म्हणून श्री विठ्ठलराव थिपे (संचालक ग.शी. प्र.मं. गडचांदूर हे होते तर प्रमूख अतिथी म्हणून श्री धनंजय गोरे (प्रभारी सचिव ग. शी. प्र. मंडळ गडचांदूर) व श्री विकास भोजेकर (संचालक ग शी प्र मंडळ गडचांदूर) हे होते तर या कार्यक्रमाच्या प्रमूख निमंत्रिका म्हणून प्रा. सौ स्मिता अनिलराव चिताडे , मुख्यध्यपिका तथा प्राचार्या म.गांधी वि व उच्च मा. वि गडचांदूर या होत्या सोबतच उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहूरे , उपमुख्यध्यापक श्री.अनील काकडे यांची प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थिती होती.
वरील मान्यवर अतिथीच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ स्मिता अनिलराव चिताडे मॅडम यांनी केले. त्यानी प्रस्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला व सर्व माजी विध्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. स्वागताध्यक्ष श्री विठ्ठलराव थिपे यांनी विध्यार्थ्यांच्या जुन्या काळातील आठवणीना उजाळा दिला. तर श्री धनंजय गोरे यांनी सुध्दा आपले याप्रसंगी आपले विचार मांडले. तर अध्यक्षीय भाषणातुन डॉ अनिलराव चिताडे यांनी शिक्षण, शाळा, शिक्षक आणि विध्यार्थी यांचा कसा ऋणानुबंध असतो आणि विध्यार्थ्यांने कशी प्रगती केली पाहिजे या यांचे मोलाचे मार्गदर्शन केले. माजी विध्यार्थी म्हणून प्रा. श्री मोरेश्वर दादाजी खुसपुरे प्रा.सौ ज्योत्स्ना राजूरकर( लालसरे ), श्री संजय रातनसिंग निराजने (वकील) सौ.सविता उरकुडे , श्री संदीप शेरकी यांनी आपल्या मनोगतातून 30 वर्षापूर्वीच्या या शाळेत विध्यार्थी म्हणून शिकत असताना जुन्या अनमोल आठवणीना उजाळा दिला. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या माजी विध्यार्थ्यांनचा सत्कार करण्यात आला व कार्यक्रमा अंती या विध्यार्थ्यांनच्या सन्मानार्थ स्नेहभोजन देखील झाले. माजी विध्यार्थी समिती प्रमुख प्रा. श्री. प्रभाकर कोल्हे यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शना खाली सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते व या समितीतील सर्वच सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिशय मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन श्री. संतोष मुंगुले यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सौ.सुरेखा ठाकरे यांनी केले. सदर कार्यक्रमाला बहुसंख्येने माजी विध्यार्थी उपस्थित होते व शाळेने त्याच्या प्रति दाखवलेल्या या स्न्हेहाने ते भारावून गेले होते.
,