लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,
आज ग्लोबल युगात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास ठेऊन कठोर परिश्रम घेऊन उंच भरारी घ्यावी, सुप्त गुणांना चालना द्यावी असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री डॉ निशिगंधा वाड यांनी स्थानिक महात्मा गांधी विद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन च्या बक्षीस वितरण कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलताना केले,53 वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्ष मध्ये झालेले रूपांतर बघून त्यांनी शाळेची तसेच व्यवस्थापक मंडळाची प्रशंसा केली,
बक्षीस वितरण सोहळा च्या
*अध्यक्ष*स्थानी मा. डॉ. अनिलराव चिताडे ,
परीक्षा संचालक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तथा संचालक गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर होते,
*कार्यक्रमाच्या विशेष अतिथी* म्हणून
डॉ. निशिगंधा वाड,
मराठी सिने सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या
* प्रमुख पाहुणे* म्हणून
धनंजय गोरे ,प्रभारी सचिव गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर,
विठ्ठलराव थिपे ,ज्येष्ठ संचालक गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर
विकास भोजेकर ,संचालक गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर
रामचंद्र पा. सोनपितरे संचालक गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर,श्रीमती उज्वला ताई धोटे,पुष्पाताई हिरादेवे,
सविताताई टेकाम ,नगराध्यक्षा नगरपरिषद गडचांदूर
शरद जोगी ,उपनगराध्यक्ष नगरपरिषद गडचांदूर,
सचिन भोयर माजी उपनगराध्यक्ष नगरपरिषद गडचांदूर
रऊफ खान वजीर खान
माजी उपसभापती पंचायत समिती कोरपना
सौ. स्मिताताई चिताडे मुख्याध्यापक/ प्राचार्या
महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर
सौ. रश्मीताई भालेराव
मुख्याध्यापिका महात्मा गांधी स्कॉलर्स अकॅडमी गडचांदुर होत्या,डॉ निशिगंधा वाड यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीसे वितरित करण्यात आली, डॉ अनील चिताडे यांनी मार्गदर्शन केले,
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक*
सौ. स्मिताताई चिताडे यांनी केले,,शाळेच्या प्रगती चा आढावा सादर केला,
मा. डॉ. निशिगंधा वाड यांचा परिचय
प्रा. आशिष दरेकर यांनी करून दिला,याप्रसंगी डॉ निशिगंधा वाड यांचा भव्य सत्कार करण्यात आला,
कार्यक्रमाचे संचालन
प्रा प्रदीप परसुटकर यांनी केले
तर आभार
रविंद्र चौधरी यांनी मानले,
याप्रसंगी गावातील पुरुष, महिला, विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते, पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता,