लोकदर्शन 👉 अशोककुमार भगत
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तळोधी चे मुख्याध्यापक आर.बी.गावंडे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकावून तसेच महात्मा गांधी व बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.गावात नारे देऊन रॅली काढण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच ज्योतीताई जेणेकर यांनी गावातील सर्व विद्यार्थांनी संविधानाचे वाचन करावे असे आवाहन केले.प्रमुख अतिथी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा नैनाताई कापसे यांनी बाबासाहेबांनी संविधान लिहून भारतियांवर अनंत उपकार केले आहेत असे मनोगतात सांगितले.ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कुळमेथे यांनी गावाचा व शाळेचा विकास करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली.ग्रामपंचायत सदस्या कुसुमताई संकुलवार यांनी संविधान निर्मिती कशी झाली हे मनोगतातून सांगितले.ग्रामपंचायत सदस्य गोरखनाथ लांडगे यांनी बाबासाहेब तथा भारतातील महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे विदयार्थांना आवाहन केले.गुरुदेव सेवा मंडळ सदस्य महादेव येसेकर यांनी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली की देश सुधारायला काही वेळ लागणार नाही त्यासाठी देशाच्या प्रगतीचा विचार सर्वांनी करावा व तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील गणराज्य कल्याण साकार् करावे असे मार्गदर्शन केले.अनिलभाऊ कुंभारे यांनी भारताला मिळालेले स्वातंत्र व राज्यघटना याबाबतचे सखोल माहिती सांगितली.मंचकावर प्रमुख अतिथी अनिल संकुलवार,रवींद्र गोहोकर , वंदना गोखरे,रमेश गोखरे,संजीवनी रायपूरे, विद्याताई टेकाम,निताताई झुंगरे,अविनाश आत्राम, महादेव ठावरी,ज्ञानेश्वर कुबडे,शामराव जेणेकार, रंजिता कुंभारे,मायाताई गोखरे , एकनाथ् लांडगे,बाबाजी मत्ते,विठ्ठल गोहोकार उपस्थित होते.कार्यक्रमांचे संचालन अजित साव तर आभार संतोष जुनगरि यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक कांतीलाल चव्हाण तसेच विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.