लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर:- देशातील सर्व राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षांनी शेवटच्या स्तरापर्यंत पक्षांतर्गत लोकशाही जीवंत राखली तरच प्रजासत्ताक दिन चिरायु ठरेल या देशातील महान सुपुत्रांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, संपूर्ण जीवन समर्पित केले त्या मागील भावनांचा सन्मान राखत सर्वांनी लोकशाहीचे तत्व चिरंतन ठेवण्यासाठी कर्तव्य पार पाडले पाहिजे असे विचार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शहीदवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके शहीदभूमी परीसरात ध्वजारोहण प्रसंगी व्यक्त केले.
चंद्रपूर जिल्हा कारागृह परीसरात पार पडलेल्या या ध्वजारोहण समारोह प्रसंगी उपस्थित बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतांना अहीर पुढे म्हणाले की, संविधानाने दिलेल्या मुलभूत समानतेचा अधिकार मिळालेला आजचा हा राष्ट्रीय सण आहे. आजच्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी रोजी देशात खऱ्या अर्थाने लोकशाहीची पुर्नस्थापना झाली. ही लोकशाही टिकवून ठेवण्याकरीता सामुहिक प्रयत्नांची गरज असून जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही म्हणून गणल्या गेलेल्या या लोकशाहीला चिरायु करण्यासाठी आम्हाला योगदान द्यावे लागेल असेही अहीर यावेळी म्हणाले.
याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना हंसराज अहीर व मान्यवरांच्या शुभहस्ते नोटबुक वितरीत करण्यात आले. या सोहळ्याला शहीदवीर बाबुराव शेडमाके स्मारक समितीचे अध्यक्ष दयालाल कन्नाके, विलास मसराम, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, धनराज कोवे, माजी नगरसेविका मायाताई उईके , शितल आत्राम, शितल कुळमेथे, चंद्रकला सोयाम, विठ्ठलराव कुमरे, अरविंद मडावी, सीमाताई मडावी, वंदनाताई मडावी, शाम गेडाम, प्रिती दडमल, राजू घरोटे, मोहन चैधरी, राजेंद्र खांडेकर, विनोद शेरकी, देवानंद वाढई, राजेंद्र तिवारी, आशाताई आबोजवार, बी.बी. सिंग, वंदनाताई संतोषवार, पूनम तिवारी, गौतम यादव, संजय खनके, स्वप्नील मुन, मुग्धा खांडेकर, बाळू कोलनकर, विकास खटी, सचिन संदुरकर, बंडू गौरकार, नितीन कारीया, राहुल बोरकर, प्रविण चुनारकर, राजू बिस्वास यांचेसह नागरीक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.