लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे 24 जानेवारी ला विदर्भस्तरीय समूहनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये विदर्भातील 22 शाळा महाविद्यालयाच्या चमुनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत उत्कृष्ट समूहनृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले,
प्रथम पुरस्कार 15001रुपये रोख ,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र राजुरा येथील इन्फट जेसस कॉन्व्हेंट ने पटकावला,
द्वितीय पुरस्कार रोख 10001रुपये अंबुजा विद्यानिकेत, उपरवाही ने प्राप्त केला, तृतीय पुरस्कार 7001 रुपये महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, सोनूर्ली ने मिळविला,तर प्रोत्साहन पुरस्कार 5001 रुपये शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, राजुरा ने पटकाविला,
स्पर्धेचे परीक्षण चंद्रपूर येथील मृणालिनी खाडिलकर व प्रज्ञा जीवनकर यांनी केले,
विजेत्या चमूना पुरस्कार नगर परिषद गडचांदूर चे उपाध्यक्ष शरद जोगी,माजी पंचायत समिती उपसभापती रौफ़ खान वजीर खान ,संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,संचालक विकास भोजेकर, प्राचार्या स्मिता चिताडे,प्राचार्या रश्मी भालेराव, यांच्या हस्ते वितरित करण्यात आले,याप्रसंगी उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक एच बी मस्की, बी के हस्ते,प्रा अशोक डोईफोडे व इतर उपस्थित होते, स्पर्धेचे संचालन प्रा आशिष देरकर, व प्रा सुरेखा झाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन लता घाटे यांनी केले,
याप्रसंगी विविध शाळा, महाविद्यालया चे विद्यार्थी, शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
स्पर्धेच्य यशस्वीतेसाठी आयोजन समिती च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले,