लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर:–
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुका पद्मशाली समाज संघटनांच्या वतीने पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत चिरंजीव भगवान श्री. महर्षी मार्कंडेय यांच्या जयंती दिनाचा उत्सव लक्ष्मी टाकीज हॉल आठवडी बाजार ,गडचांदूर येथे 24 जानेवारी ला उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्याने समाजातील सेवानिवृत्त झालेल्या समाज बांधवांचे सत्कार लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुभाष धोटे, होते ,उद्घाटक नगराध्यक्षा सौ. सविताताई टेकाम,होत्या, प्रमुख अतिथी म्हणून अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी,गडचांदूर चे माइन्स व्यवस्थापक सुनील अल्लेवार यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. विजय आकनुरवार, सेवानिवृत्त औषध निर्माण अधिकारी विजय रेब्बावार, सेवानिवृत्त कालवा निरिक्षक श्री राजेश परसावार यांचा सत्कार करण्यात आला. या प्रंसगी आ. सुभाष धोटे यांनी सांगितले की, चिरंजीवी भगवान श्री. महर्षी मार्कंडेय यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने पद्मशाली समाजाने नेहमीच बदलत्या काळात आपले उन्नत स्थान कायम ठेवले आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात समाजातील अनेकांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. पद्मशाली समाजाचे अखिल भारतीय जेष्ठ नेते आमदार स्व आचार्य कोंडा लक्ष्मण बापूजी हे राजुराचे आमदार होते. राजुरा – आंध्र प्रदेश (तेलंगणा) प्रथम आमदार, यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे. समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार हे सुध्दा अनेकांना प्रेरणा देत असतात. अनुभवी व्यक्तींकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. असे त्यानी सांगितले यावेळी प्रा विजय आकनुरवार यांनी सुद्धा पद्मशाली समाजाचे विविध प्रश्न मांडले
कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुका अध्यक्ष सतीश बेतावार, यांनी केले संचालन प्रा अतुल अल्लेवार यांनी केले ,तर सचिव संजय कोंडबत्तुरवार,यांनी आभार मानले ,याप्रसंगी प्रवीण बोम्मावार, प्रकाश तूम्मेवार, संतोष बोम्मावार, संपत सुके, संजय कोकुलवार, यासह अनेक समाज बांधवांची उपस्थिती होती.