लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय, व उच्च माध्यमिक विद्यालय, विज्ञान महाविद्यालय,विद्या मंदिर व स्कॉलर अकॅडमी गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन,2023 वसंतोत्सव चे उद्घाटन महात्मा गांधी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात 23 जानेवारी 23 ला संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली अल्ट्रा टेक सिमेंट, गडचांदूर चे युनिट हेड मा अतुल कन्सल ,यांच्या हस्ते करण्यात आले, विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठ चे परीक्षा संचालक तथा संस्था संचालक डॉ अनिल चिताडे होते प्रमुख अतिथी म्हणून लेडीज क्लब च्या अध्यक्ष सौ रचना कंसल,सौ दीपा गुप्ता, सौ वंदना तिवारी,संस्था उपाध्यक्ष राहुल बोढे, प्रभारी सचिव धनंजय गोरे,संचालक विठ्ठलराव थिपे, विकास भोजेकर, रामचंद्र सोनपितरे,प्राचार्या सौ स्मिता चिताडे, प्रभारी प्राचार्य रामकृष्ण पटले,प्राचार्या सौ रश्मी भालेराव, होत्या ,
याप्रसंगी डिजिटल बोर्ड ,चे उद्घाटन अतिथी च्या हस्ते करण्यात आले, अल्ट्रा टेक कंपनी गडचांदूर च्या वतीने शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या 20 गरीब गरजु विद्यार्थी नीना सायकल वाटप करण्यात आले,
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखित चे प्रकाशन करण्यात आले, तसेच नुकतेच सेवानिवृत्त झालेले उपप्राचार्य विजय आकनूरवार , शिक्षक भूमन्ना पत्तीवार,बंडुभाऊ धोटे,सुरेश मेश्राम यांचा सपत्नीक शाल,श्रीफळ, साडी,सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला,तसेच प्रा आशिष देरकर यांच्या शोधप्रबंधला आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला,
यावेळी डॉ अनिल चिताडे यांनी स्नेहसंमेलन मध्ये विद्यार्थ्यांना सुप्त गुण प्रदर्शित करण्याची संधी मिळते तेंव्हा विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले, अल्ट्रा टेक चे युनिट हेड अतुल कन्सल यांनी विद्यार्थ्याना कठोर परिश्रम घेऊन यश संपादन करण्याचे आवाहन करून शाळेचा गौरव केला व शाळेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले,
सौ रचना कंसल यांनी आपल्या भाषणात विद्यालयातून चारित्र्य संपन्न विद्यार्थी तयार होतात असे सांगितले
आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळेच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले,
प्राचार्या स्मिताताई चिताडे यांनी प्रास्ताविक मधून शाळेच्या 53 वर्षातील प्रगतीचा आढावा सादर केला,
कार्यक्रमाला सेवानिवृत्त प्राचार्य गिरीधर बोबडे, व प्रशांत उपलेंचवार, पर्यवेक्षिका शोभा जीवतोडे,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे,पर्यवेक्षक एच बी मस्की,बी,के हस्ते,एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे,इतर प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते,कार्यक्रमाचे संचालन प्रशांत धाबेकर व लता घाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा आरजू आगलावे यांनी केले