by : Shankar Tadas
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत डॉ. खत्री महाविद्यालय, चंद्रपूर व सायन्स कॉलेज नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वन अकॅडमी, चंद्रपूर येथे १४ ते १५ जानेवारीला आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागातून जनता महाविद्यलायातील वनस्पतीशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. उमाकांत भू. देशमूख यांचा शोधनिबंध सर्वश्रेष्ठ ठरला.
‘Calytocarpus vialis Less. (Asteraceae): An alien weed new addition to Chandrapur District Flora (M.S.) India’ या विषयावर सहायक प्रा. डॉ. उमाकांत भू. देशमूख यांनी शोधनिबंध सादर केला होता. त्यात त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. या परिषदेसाठी देशभरातील ७०० संशोधकांनी नोंदणी केली होती. अनेक संशोधकांनी यावेळी पेपर सादरीकरण केले. सहायक प्रा. डॉ. उमाकांत भू. देशमूख यांनी सादर केलेल्या शोधनिबंधात अमेरिका येथील सूर्यफुलाच्या कुळातील “Calytocarpus vialis Less.“ या आक्रमक विदेशी वनस्पती चे पहिल्यांदाच विदर्भातील चंद्रपूर येथून नोंद केली आहे. Calytocarpus ह्या वंशाची ही विदर्भातून पहिलीच नोंद आहे.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. एन. एच. खत्री, मुख्य अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. एस.एस. कावळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे, डॉ. प्रदीप घोरपडे, डॉ. एन.एस. कोकोडे, डॉ. आशिष लांबट, अविनाश आकुलवार, डॉ. एस.बी. कपूर, खत्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.एम. काकडे, सायन्स कॉलेज नागपूरचे प्राचार्य डॉ. एम.पी. ढोरे, डॉ. ए.डी. बोबडे, डॉ. प्रवीण तेलखडे होते.
सहायक प्रा. डॉ. उमाकांत भू. देशमूख यांनी आपल्या यशाचे श्रेय चान्दा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकभाऊ जीवतोडे, जनता विद्यालाचे प्राचार्य डॉ. म. सुभास आणि वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमूख डॉ. मुकुंद बा. शेंडे यांना दिले आहे. त्यांच्या या यशाबद्दल उप प्राचार्य डॉ. महातले, प्रा.जोगी,प्रा. दुधपाचारे सर, उप प्राचार्य डॉ.पाटील,उप प्राचार्य प्रो. बोधाले सर,प्रा. बेग मॅडम , प्रा. जिवतोडे, प्रा.चटप, प्रा.यार्दी, प्रा. वरारकर, प्रा. कुत्तरमारे, प्रा. सुरिया तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.